विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोशी तुलना करून न्यूयॉर्क मेट्रोची पोलखोल; सगळीकडे घाण, सांडपाणी आणि कचऱ्याने भरलेले डबे गोल!!, हा प्रकार रशियन न्यूज चॅनेल स्पूटनिकने समोर आणला आहे. Delhi Metro
एरवी अमेरिकन लोकांना आपल्या न्यूयॉर्क शहराचा आणि स्वच्छतेच्या अतिरेकाचा गर्व वाटत असतो. अमेरिकन शहरे जगातल्या इतर शहरांपेक्षा फारच स्वच्छ आहेत इथे वाहतुकीला शिस्त आहे असा दर्प अमेरिकन लोक मारत असतात. पण प्रत्यक्षात इतरांना नावे ठेवणारे लोक स्वतः किती अस्वच्छ आहेत, हे रशियन चैनल स्पूटनिकने एका रिपोर्ट मधून दाखवून दिले. स्पूटनिकने त्यासाठी न्यूयॉर्कचे मेट्रो स्टेशन निवडले. तिथल्या सगळ्या घाण परिस्थितीचे शूटिंग केले. मेट्रोच्या रुळांच्या खाली वाहणारे सांडपाणी एका कोपऱ्यात जाळी लावून ठेवलेला प्रचंड कचरा, स्टेशनवर ड्रग्सच्या नशेत बसलेले तरुण त्याचबरोबर मेट्रो ड्रग्सच्याच नशेत झोपलेले तरुण हे सगळे शूट केले.
पण स्पूटनिक न्यूज चॅनेल एवढेच शूट करून थांबले नाही. त्यांनी दिल्ली मेट्रोचे देखील शूटिंग केले. न्यूयॉर्क मेट्रोच्या तुलनेत दिल्लीचे मेट्रो कशी स्वच्छ, मेट्रो स्टेशन किती अत्याधुनिक हे दाखवून दिले. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणारे प्रवासी ड्रग्सच्या नशेत नाहीत तर ते सर्वसामान्य प्रवासी कामाच्या ठिकाणी जात आहेत, असे दाखविले.
या तुलनेतून स्पूटनिकने अमेरिकेच्या विकासाची पुरती पोलखोल केली. एवढेच नाही, तर आपल्या स्वच्छतेचा आणि प्रगतीचा गर्व असणाऱ्या अमेरिकन लोकांचे नाक ठेचले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App