CM Fadnavis : डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी माजी खासदारांवरील आरोप फेटाळले; रणजितसिंह निंबाळकरांचा काही संबंध नाही

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

सातारा : CM Fadnavis  सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे निंबाळकरांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.CM Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत फलटणमधील विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडत आहे. विशेष म्हणजे, डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलेल्या हॉटेलसमोरच मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता समारंभ पार पडणार आहे. तर पोलिस ठाण्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एका कार्यक्रमात बोलताना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी भाजप नेत्यावर होणाऱ्या आरोपांवर थेट भाष्य करत, रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागे ठामपणे उभे राहिलेत.CM Fadnavis



नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

परवा आमच्या एका डॉक्टर लहान बहिणीचा अतिशय दुर्दैवीपणे मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या करताना त्याचे कारणही आपल्या हातावर लिहून ठेवले. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटकही केली. त्यातील सर्व सत्य हे बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हा देखील निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रणजित दादांचे नाव घुसवण्याचा प्रयत्न झाला

अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टी राजकारण घुसवायचे, अशाप्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजित दादा, सचिन दादाचे नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करुन मी या ठिकाणी आलो नसतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

अशा बाबतीत मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही आणि राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहेत, तिथे मी कुठलीही तडजोड करत नाही. पण त्याचवेळी प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत जर राजकीय भूमिका कोणी घेत असेल, तर तेही मी सहन करणार नाही. त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील तुम्ही समजून घ्या, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

CM Fadnavis Clears Former MP Ranjeetsinh Nimbalkar Of Involvement In Phaltan Doctor Suicide Case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात