विशेष प्रतिनिधी
बीड : Pankaja Munde मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असेही मुंडे म्हणाल्या. परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.Pankaja Munde
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला. प्रत्येकाला एससी एसटी व्हायचे आहे. जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे. एससी एसटीचे आरक्षण केंद्र सरकार देते. मी कधीही निझामाचे गॅझेट असे बोलले नाही. मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे. मी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही.Pankaja Munde
आजचा कार्यक्रम अराजकीय नाही. मी कामापुरते नाते जोडत नाही. ज्यांच्या बरोबर आपला विरोध होता ते आपल्या सोबत आहेत. माझे बाद मत मोजले असते तरी मी निवडून आले असते, असे भाष्य पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराजयावर केले. गोपीनाथ मुंडे विजयानंतर माझी पोरगी सर्वांवर भारी पडली, असे म्हणाले होते. त्यांनी मला थँक्यू म्हटले होते, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
ज्यांनी माझे वाईट चिंतले नाही, असे सर्वजण व्यासपीठावर आहेत. लोकसभा निवडणुकीत मला मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले गेले. त्यावेळी मी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्यावर ठाम होते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मला कोणाचाही राग नाही. पंकजा ताई हरल्यावर काहींनी आत्महत्या केल्या, त्यानंतर मी हादरले. त्यावेळी मी ठरवले आता मारायचं पण हरायचं नाही. लोकसभा निवडणुकीला बीड थोडक्यात हरले. पण मी एकमेव विधान परिषदेची आमदार जी मंत्रिमंडळात आहे. मी कोणालाही विधानसभा निवडणुकीत उभे केले नाही. माजी मंत्री बदामराव पंडित आणि गेवराईचे स्थानिक नेते बाळराजे पवार हेत आता आपल्या सोबत आहेत. युतीबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी दररोज 400 लोकांना भेटते. मी तुमच्या सुखात नाही तर दुःखात सोबत आहे. संघर्षात सोबत आहे. दारू बनवत असलो तरी आम्ही पाजत नाही. निवडणुकीत वज्रमूठ करा. तसेच अजित पवार यांच्यासोबत युतीची चर्चा झाली आहे. काही ठिकाणी युती होईल. काही ठिकाणी होणार नाही. जास्त डोकं लावू नका, फक्त काम करा. इतर ठिकाणच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे येऊ नका, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
वैद्यनाथ कारखान्यात 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार
कारखान्यांवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, लोकांचे कारखाने गंजून गेले आहेत. मी गोपीनाथ मुंडेंचा वारसा आहे. मी कसा कारखाना विकेल? माझ्या कारखान्याला पैसे मिळाले नाहीत. सगळ्यांच्या कारखान्याला पैसे मिळाले. मी माझ्या बापाचे चौथे अपत्य जगवले आहे. यावेळी वैद्यनाथ कारखान्यात 10 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App