विशेष प्रतिनिधी
शिर्डी : Shirdi Sai Baba दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवारची जोड मिळाल्याने मागील चार दिवसांपासून शिर्डीत देशभरातून आलेल्या साईभक्तांची मोठी गर्दी झाली. साईनगरीच्या संपूर्ण परिसरातील वाहनतळ, पार्किंग, भक्तनिवास आणि साईमंदिर दर्शनरांग सर्वत्र हाऊसफुल्ल आहे. गेल्या चार दिवसांत सात लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात ५ लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले होते. संपूर्ण शिर्डीत भाविकांचा उत्साह आणि साईनामाचा गजर अनुभवायला मिळत आहे.Shirdi Sai Baba
नव्याने उभारलेल्या दर्शनरांगेच्या व्यवस्थेमुळे यंदा दर्शन सुलभ आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. गर्दी असूनही भाविकांना चार तासांत साईबाबांचे दर्शन घेता येत असल्याने समाधान त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे. देशातील विविध राज्यांमधून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद आणि पुणे येथून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीकडे धाव घेत आहेत. शिर्डी विमानतळावरही गर्दीचा उच्चांक बघायला मिळत आहे. देशातील विविध शहरांतून येणारी सर्व विमाने खचाखच भरून येत आहेत.Shirdi Sai Baba
शिर्डी विमानतळावरून सध्या सुरू आहेत दररोज १६ उड्डाणे
शिर्डीत इंडिगो कंपनीने दिल्ली मार्गावर दोन अतिरिक्त विमानांची भर घातली आहे. दिल्लीहून शिर्डीसाठी दोन तर शिर्डीतून दिल्लीसाठी तीन विमानांचे दररोज उड्डाणे आहेत. शिर्डीत सध्या एकूण १६ विमानांची दररोज ये-जा सुरू आहे. यामध्ये दिल्ली, बंेगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथून उड्डाणे होत आहेत.
शनिशिंगणापूरला २ लाख, तर देवगडला २५ हजार भाविक
शनिशिंगणापूरला शनिवारी दिवसभरात दोन लाखांवर भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले, तर देवगडला २५ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले. गेल्या वर्षी ही संख्या पावणेदोन लाख होती. शनिशिंगणापूरला पहाटेपासून तर देवगडला सकाळी नऊ वाजेपासून दर्शनाला रांगा होत्या. शनिशिंगणापूरला देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे व व्यवस्थापक राजेंद्र वाकचौरे यांनी थांबून गर्दीचे नियोजन केले. कार्यकारी समितीने शनिवारी दिवाळी सुट्ट्यातील गर्दीचे चोख नियोजन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App