विशेष प्रतिनिधी
मुंबई : सतत नकारात्मक बातम्या येणाऱ्या बीडमधून सकारात्मक बातमी आली. ‘दिवाळी नवीन घरकुलात’ या उपक्रमांतर्गत बीड जिल्ह्यानं राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) तसंच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक घरकुलं विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. PM Awas Scheme
यानिमित्तानं बीडकरांचं हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न साकार झालं आहे. या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यानं संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम रचला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी अभिनंदन केले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला अधिकचे उद्दिष्ट मंजूर करून देऊन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी राज्यातील सर्वसामान्य कुटुंबांच्या घरकुल स्वप्नाला नवं बळ दिलं आहे. राज्य सरकारतर्फे त्यांच्या या निर्णयाबद्दल अजित पवारांनी आभार मानले.
बीड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर यावं, हे आमचं पुढचं ध्येय आहे. यासाठी ही योजना आणखी वेगानं आणि प्रभावीपणे राबवण्यात येईल. बीड जिल्ह्यातील कोणतंही पात्र कुटुंब हक्काच्या घराशिवाय राहणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App