राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती करणारी देशातील प्रमुख संस्था, बंदीची मागणी करणारे राष्ट्रद्रोही- बावनकुळे

विशेष प्रतिनिधी

भंडारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रभक्ती, समाजसेवा आणि राष्ट्र निर्माणासाठी कार्य करणारी देशातील प्रमुख संस्था आहे. संघावर बंदी घालण्याची मागणी करणारे राष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते भंडारा जिल्हा भाजपच्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. Chandrashekhar Bawankule

बावनकुळे म्हणाले, संघाने देशात राष्ट्रभावना निर्माण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेत संघाची विचारधारा दिसते. त्यामुळे संघावर बंदी घालण्याचा विचार करणारे देशद्रोही आहेत.



शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले नव्हते. हे पॅकेज शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी आवश्यक भांडवल उभे करण्यास मदत होईल.

आम्ही संपूर्ण नुकसान भरून काढू असे म्हणत नाही. पण हे पॅकेज शेतकऱ्यांना नव्याने उभे राहण्याची ताकद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याचा आरोप केला होता. त्यावर सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना केल्याचे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule Defends RSS Calls Ban Demanders Anti-National Viksit Bharat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात