तेजस्वी यादव आणि मुकेश सहानींना काँग्रेसने लावली लॉटरी; पण बिहारी महागठबंधन मध्ये जागा वाटपाचा घोळ कायम!!

Bihari Mahagathbandhan

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारच्या महागठबंधन मध्ये जागा वाटपाचा घोळ कायम ठेवून काँग्रेसने तेजस्वी यादव आणि मुकेश सहानी यांना लॉटरी लावून टाकली. काँग्रेसने अखेर तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा तर मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करून टाकले. मात्र, काँग्रेसने स्वतःचा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही.

काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी लालूप्रसाद यादव यांच्या घरी जाऊन महागठबंधन मधील तेढ सोडवली. पण जागा वाटपाचा घोळ ते निस्तरू शकले नाहीत. त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायची तयारी दाखविली त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषदेत तसे जाहीरही केले. विधानसभा निवडणुकीत दोन-तीन आमदार निवडून आणण्याची क्षमता राखणाऱ्या विकासशील इंसान पार्टीचे नेते मुकेश सहानी यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लावली. त्यामुळे काँग्रेस छोट्या पक्षांना सुद्धा जवळ करू शकते असे मधाचे बोट यांनी सगळ्या छोट्या प्रादेशिक पक्षांना दाखविले.



– राजद 143, काँग्रेस 61

पण महागठबंधन मधला जागा वाटपाचा घोळ मात्र निस्तरू शकला नाही. 243 पैकी आठ जागांवर तो घोळ कायम राहिला. तेजस्वी यादवांच्या राजदच्या वाट्याला 143 काँग्रेसच्या वाट्याला 61 जागा आल्या. पाच जागांवर काँग्रेस आणि राजद यांचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार आहेत, तर तीन जागांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची लढत काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर होणार आहे.

पण महागठबंधन मध्ये मुळात तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यावरून काँग्रेस आणि राजद यांच्यात भांडण जुंपले होते. राहुल गांधींची भेट न घेताच तेजस्वी यादव पाटण्याला परतले होते. तेजस्वी यादव यांनी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केले होते, पण राहुल गांधींनी तेजस्वीला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले नव्हते. त्यामुळे काँग्रेस आणि राजद यांच्यात “फाटले” होते. पण अशोक गेहलोत यांनी ते “शिवले” आणि आज त्यांनीच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केले.

Congress holds lottery for Tejashwi Yadav and Mukesh Sahni; But the confusion over seat allocation in Bihari Mahagathbandhan continues!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात