विशेष प्रतिनिधी
नाशिक : अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या संसारावर संकट कोसळलं आहे. पण त्यांचा आत्मविश्वास अजूनही ठाम आहे. राज्यातल्या फडणवीस सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज देखील जाहीर केले आहे. पण त्याचवेळी भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे एका अनोख्या संकल्पासह मदतीसाठी पुढे आले आहेत. आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांना ते 100 गाई देणार आहेत.A helping hand to disaster-affected farmers –Initiative of BJP MLA Mahesh Landge
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते “एक हात मदतीचा – गोधन दान” या उपक्रमाचा पहिला टप्पा मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, बोऱ्हाडेवाडी या ठिकाणी शुक्रवार दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी दु. 1.00 वाजता संपन्न होणार आहे.
या अंतर्गत 100 गाईंचे गोदान पूरग्रस्त पिडीत शेतकरी कुटुंबांना करण्यात येणार असून, त्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्या आशेचा किरण उजळावा त्यांच्या घराचं पुन्हा गोकुळ व्हावं या उद्देशानेच आम्ही हा संकल्प केला आहे..
गोसेवा म्हणजे समाजसेवा, आणि शेतकऱ्यांची सेवा म्हणजे राष्ट्रसेवा! चला, आपण सर्व मिळून या मानवतेच्या पर्वात शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया!, असे महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App