विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. तिच्यावर बंदीची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदरील विधान केले. तसेच लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांनी नुकताच ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आणि त्याचबरोबर दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. दिवाळीचा उत्साह लक्षात घेऊन शिंदेंनी या योजनेच्या पुढील हप्त्याचा थेट ‘भाऊबीज’ असा उल्लेख केला. पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल विचारले असता, एकनाथ शिंदे म्हणाले की, “लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार आहे.” त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, “लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार,” ज्यामुळे पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पात्र बहिणींच्या घरी लक्ष्मी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Eknath Shinde
आरएसएसवर बंदीचे वक्तव्य दुर्दैवी
यावेळी आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची मागणी केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, खरे म्हणजे अशा प्रकारचे वक्तव्य दुर्दैवी आहे. कारण RSS ही एक कडवट देशभक्त, राष्ट्रभक्त संघटना आहे. कधीही आपत्ती संकट येते त्यावेळेस RSS ही संघटना धावून जाते. प्रखर राष्ट्र आणि देशभक्तीवर काम करणारी RSS ही संघटना आहे अशा RSS वर बंदी घालावी असे म्हणणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
महायुतीचा भगवा डौलाने फडकेल
एकनाथ शिंदे यांनी यावेळी राजकीय घडामोडींवरही प्रतिक्रिया दिली. भाई जगताप यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय आणि अधिकार घेत असतो. त्यांचा तो निर्णय असेल. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचाच भगवा डौलाने फडकेल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
आरएसएससंदर्भात यूपी काँग्रेसचे शहांना पत्र
दरम्यान, कर्नाटक सरकारने अलिकडेच सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर RSS च्या कार्यक्रमांवर मर्यादा घालणारे नियम प्रस्तावित करण्यात आलेत. तसेच, उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी RSS वर देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणारे पत्र पाठवले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App