विशेष प्रतिनिधी
मुंबई : Navnath Ban पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोदींनी कधीही टीका केली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर संजय राऊत हे चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे.Navnath Ban
नवनाथ बन म्हणाले की, राजकारणात चिखलफेक करण्याची सुरवात संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिखलफेक करत नाहीत तर स्वच्छ भारत अभियान राबवण्याचे काम करत आहेत.चिखलफेक करणारे तुम्ही आहात. मुंबई मनपाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत. सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आगामी मनपा निवडणूकीत सर्वसामान्य मुंबईकर तुम्हाला ढवळून काढतील. मतदार हे भाजप-शिंदे यांच्यासोबत आहेत.Navnath Ban
मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करणे उबाठाचे काम
नवनाथ बन म्हणाले की, मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करणे उबाठा गटाचे काम आहे, 2019 मध्ये उबाठाने भाजपला फसवले असे म्हणत नवनाथ यांनी बन यांनी राऊत यांच्यासह उबाठावर टीका केली आहे. तर संजय राऊत हे गॅग ऑफ ठग्जचे सरदार आहेत असा टोला बन यांनी लगावला आहे.
मग तक्रार का केली नाही
नवनाथ बन म्हणाले की, पगारी नेते संजय राऊत असे म्हणत आहेत की भाजप काय निवडणूक आयोगाचा वकील आहे का, आम्ही काही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत तर जनतेची वकिली करण्याचे काम भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आम्ही जनतेकडून तुम्हाला उत्तर देत आहोत. ज्या प्रमाणे तुम्ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी निर्माण केली आहे. 96 लाख बोगस मतदारांचा आकडा तुम्ही आणला आहे, पण एकही नाव तुम्ही देऊ शकलेले नाहीत. निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार देखील दिलेली नाही.केवळ माध्यमांसमोर आम्ही विधानसभेला उद्ध्वस्त केली. आता मनपा निवडणूकीत जनता तुम्हाला आणि फेक नरेटिव्हची फॅक्टरी जनता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही.
दुबार नावावर आमचा देखील आक्षेप
नवनाथ बन म्हणाले की, मतदान यादीमधील दुबार नावावर आमचा देखील आक्षेप आहे. आमचा त्याला विरोध आहे. परंतू आम्ही ती लढाई कायदेशीर रित्या लढतो तक्रार करतो. फक्त माध्यमांसमोर येऊन बोलत नाही. राऊतांनी मंदा म्हात्रे यांना प्रश्न विचारण्यापेक्षा शरद पवारांना जाऊन प्रश्न विचारला पाहिजे. पवारांनी म्हटले होते की मुंबईत मतदान करा आणि बोटाची शाई पुसून टाका आणि पुन्हा गावाकडे जात मतदान करा. तुम्ही पवारांना प्रश्न करणार का? असा सवाल बन यांनी केला आहे. आम्हाला दुबार मतदान यादीच्या नावाबद्दल शंका आहे त्याबद्दल आम्ही तक्रार करु. पण शरद पवारांनी जे विधान केले त्यावर संजय राऊत त्यांना सवाल करण्याची हिंमत करत नाही त्यांनी एकदा पवारांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App