Maharashtra : ऐन दिवाळीत पावसाचा तडाखा; कोकणासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अलर्ट

Maharashtra

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये पावसाने आज दुपारी अचानक हजेरी लावली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.



हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषतः मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पूरपरिस्थितीचा सामना केला होता. या काळात मोठी जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली आणि मोठी पडझड झाली होती. या नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा आलेल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Maharashtra Unseasonal Rain IMD Alert Diwali Konkan Marathwada Stormy Wind

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात