विशेष प्रतिनिधी
मुंबई : अजितदादा तर भाजप समोर किस झाड की पत्ती आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला. पण त्यापूर्वी त्यांनी भाजपवर सुद्धा तोंडसुख घेतले. ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपने ठगा नही. अजितदादा तर भाजप समोर किस झाड की पत्ती आहेत, असे संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut
सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणावर संजय राऊत यांनी भाष्य केले. सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचा मुलगा रणजीत शिंदे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी भाजपने एकेक मोहरे गळाला लावायला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपा आणि अजित पवार या दोघांवरही निशाणा साधला. ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपने ठगा नही. अजि दादा तर भाजप समोर किस झाड की पत्ती आहेत, असा टोला संजय राऊत यांनी हाणला.
दत्तात्रय भरणे यांचा दौरा
भाजपने तीन माजी आमदार गळाला लावल्यानंतर राष्ट्रवादीची आणखी पडझड थांबविण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना अजित पवारांनी सोलापूर दौऱ्यावर पाठविले. प्रत्येक जण आपल्या राजकीय फायद्याचा विचार करत असतो पण आमचे कोणीही नेते फुटणार नाहीत असा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला, पण पक्षाचे तीन आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असताना स्वतः अजित पवार अजून तरी तिथे गेलेले नाहीत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App