Raj Thackeray : राज ठाकरेंना राहुल, राऊतांचा वाण नाही, पण गुण लागला; 96 लाख खोटे व्होटर असल्याच्या आरोपावर भाजपचा पलटवार

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.Raj Thackeray

राज ठाकरे यांनी रविवारी राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याचा आरोप केला होता. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद व महापालिकांकडे वळवला आहे. या निवडणुकांचा निकाल निश्चित झाला आहे. च्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी महानगरांमधील मतदार याद्यांत सुमारे 96 लाख खोटे मतदार घुसवण्यात आलेत. त्यामुळे मतदारयाद्या स्वच्छ होईपर्यंत व त्या सर्वच राजकीय पक्षांना मान्य होईपर्यंत आपण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे.Raj Thackeray



टिमकी वाजवणारे जोरदार तोंडावर आपटले

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिपक येरूकर यांनी केलेल्या एका विधानाचाही दाखला दिला. ते म्हणाले, राज ठाकरे, तुम्ही सुध्दा? दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार दिपक येरूकर यांना ते रहात असलेल्या बुथवर फक्त 2 मते मिळाली. ‘माझ्या घरातच 4 मते आहेत, तीसुध्दा मिळणार नाहीत का?’ असा आरोप करून ईव्हीएमच्या विरोधात त्यांनी जोरदार सनसनाटी निर्माण केली होती. त्यांच्या विधानाची सत्यासत्यता न तपासताच अनेक मंडळी लगेचच कामाला लागली व या निमित्ताने भाजपावर तोंडसुख घेत सुटली.

प्रत्यक्षात त्यांच्या बूथवर त्यांना 54 मते मिळाली असल्याचे नंतर स्पष्ट होताच त्यातील हवा निघून गेली, व त्या सनसनाटीमध्ये आपली टिमकी वाजवणारे जोरदार तोंडावर आपटले.

राज ठाकरेंना राहुल, राऊतांचा वाण नाही पण गुण लागला का?

आता हा प्रसंग आठवायचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात 96 लाख मते खोटे मतदार असल्याचे काल राज ठाकरेंनी भाषणात सांगितले. बरं, अशा बेछूट आरोपावरही आक्षेप काहीच नाही, ते मत मांडू शकतात, पण त्याला टीचभर तरी पुरावा दिला पाहिजे ना? राहुल गांधीपासून उध्दव ठाकरे, संजय राऊत हे सगळे जण मनाला येतील ते आरोप करीत असतात. राहुल गांधी व संजय राऊत यांना तर खोट्या आरोपावरून न्यायालयाने ताकीद दिली, पण त्यांचा स्वभाव आहे तसे ते वागतात. पण राज ठाकरेंसारखा विचार करणारा नेता असा बोलायला लागतो तेव्हा विरोधकांच्या विचारशक्तीची कीव करावी लागते!

मविआ मध्ये प्रवेश मिळायच्या आधीच राज ठाकरे यांनाही राहुल, राऊत यांचा वाण नाही पण गुण लागला का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

BJP Raj Thackeray Fake Voters Allegation Rahul Raut Trait Jibe

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात