विशेष प्रतिनिधी
मुंबई : Gopichand Padalkar जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या कारखान्याची दिवाळखोरी आणि पुढील विक्री हा विषय पुन्हा पेटला असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी जोरदार भूमिका घेत संघर्षाची हाक दिली आहे.Gopichand Padalkar
पत्रकार परिषदेत बोलताना पडळकर म्हणाले की, हा कारखाना जतकर शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभा राहिला, पण तत्कालीन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या मनमानीने तो दिवाळखोरीत गेला आणि नंतर कवडीमोल दराने विकला गेला. हा कारखाना पुन्हा सभासद शेतकऱ्यांना परत मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा देणारच, पण गरज पडली तर रस्त्यावरही उतरू. आता कोणालाही सुटी नाही, संघर्ष अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला.Gopichand Padalkar
पडळकरांनी सांगितले की, या कारखान्याशी जोडलेल्या वीस हजारांहून अधिक सभासद शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हक्कासाठी आम्ही जीवाची बाजी लावू. माझ्याकडे कारखान्याच्या व्यवहारांशी संबंधित अनेक कागदपत्रे आली आहेत. त्यांचा अभ्यास करून आम्ही लवकरच ठोस पावले उचलू, असा इशाराही त्यांनी दिला.Gopichand Padalkar
ते म्हणाले की, हा कारखाना परत मिळवण्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांना एकत्र करून मोठा संघर्ष उभा करू. आगामी हंगामात या कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. जोपर्यंत सभासद शेतकऱ्यांना कारखाना परत मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
जयंत पाटलांवर अप्रत्यक्ष निशाणा
या पत्रकार परिषदेत पडळकरांनी जरी आमदार जयंत पाटील यांचे नाव स्पष्टपणे घेतले नाही, तरी त्यांच्या विधानांमधून थेट टीका सूचित होत होती. ज्यांनी कारखान्याचा गैरव्यवहार केला, ज्यांच्या कार्यकाळात तो बुडाला, त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. कारखाना विकत घेणाऱ्यांनाही विचार करावा लागेल, असे पडळकर म्हणाले. ज्यांनी जतच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यांनी आता शेतकऱ्यांसमोर येऊन उत्तर द्यावे. जतची जनता शांत बसणारी नाही. कारखान्याच्या मालकीवर आमच्या हक्काची शिक्कामोर्तब होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले.
ही भूमिका भाजपचीच, पडळकरांचा ठाम दावा
आमदार पडळकरांनी स्पष्ट केले की, ही केवळ माझी नाही, तर भाजपची अधिकृत भूमिका आहे. जत तालुक्यातील साखर कारखाना पुन्हा सभासदांच्या नावावर व्हावा, यासाठी आम्ही सर्व पातळ्यांवर प्रयत्न करू. शेतकऱ्यांचे हक्क आम्ही कुणालाही हिरावू देणार नाही. ते म्हणाले की, ज्यांनी कारखान्याबरोबर करार केले आहेत, त्यांनी आता यावर विचार करावा. कारण सभासदांच्या न्यायासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने आणि जनआंदोलनाच्या माध्यमातून दोन्ही पद्धतीने लढणार आहोत.
भूमिपुत्रांवर अन्याय का? पडळकरांचा सवाल
पडळकरांनी कारखान्याच्या व्यवस्थापनातील विसंगती आणि अन्यायावर थेट भाष्य केले. ते म्हणाले की, कारखान्यात सध्या काम करणारे कामगार बाहेरचे आहेत. मग जतच्या भूमिपुत्रांना कामावरून वंचित का ठेवले गेले? स्थानिक तरुणांचा रोजगार हिरावला गेला आहे. प्रस्थापित मंडळी मात्र गप्प बसलेली दिसतात. त्यांनी आरोप केला की, कारखान्याच्या परिसरातून काढलेल्या कालव्याच्या कामातून कोट्यवधी रुपये काही मोजक्या लोकांच्या खिशात गेले. शंभरहून अधिक ऊस वाहतूकदारांकडे कारखान्याचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत, पण त्यांची वसुली का केली जात नाही? कोणाचे रक्षण केले जात आहे? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App