Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांचा मेधा कुलकर्णींना टोला, सरकार असल्याच्या थाटात वागू नये; शनिवारवाड्याबाहेरील राड्यावरून सुनावले

Neelam Gorhe

विशेष प्रतिनिधी

पुणे : Neelam Gorhe पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाड्याच्या आवारातील नमाज पठणावरून झालेल्या वादात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट लक्ष्य केले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या शनिवार वाड्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास, तिथे स्थानिक प्रशासन आहे. त्यामुळे ‘इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये,’ असा सणसणीत टोला गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना लगावला.Neelam Gorhe

शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रविवारी याच पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी वाड्याबाहेर जोरदार निदर्शने केली. मेधा कुलकर्णींनी नमाज पठण झालेल्या ठिकाणी जाऊन शिववंदना करण्याचा आणि तिथे गोमूत्र शिंपडण्याचा आग्रह धरला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्याने त्या आक्रमक झाल्या. आता यावरून नीलम गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णींना सुनावले आहे.Neelam Gorhe



नेमके काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?

शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. त्याचे काही नियम आहे. या नियमांचे पालन झाले पाहिजे. शनिवार वाड्याच्या परिसरात पुरातत्व विभागाचे काही नियम मोडले असतील तर राज्य सरकार, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी अस्तित्वात आहेत. त्यामुळे इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना लगावला.

नमाज पठण करणाऱ्यांनी संयम बाळगायला हवा होता

शनिवार वाड्यातील घटनेबाबत प्रशासन काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे आहे. याठिकाणी महिलांनी नमाज पठण केले असेल तर त्यांनीही संयम बाळाला पाहिजे होता, उद्या कोणीही म्हणेल की आम्ही मशिदीत जाऊन कीर्तन करु, पण म्हणून तसे होणार नाही, असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. त्याचे काही नियम आहे त्याचा पालन झाले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

युतीमुळे मुद्दा मांडू नये, असे होत नाही

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत, “रवींद्र धंगेकर आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे, म्हणूनच ते बोलत आहेत. मुद्दामहून आरोप करण्याऐवजी वास्तव काय आहे, हे बघून नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे म्हटले.

युती असली म्हणून कोणताही मुद्दा मांडू नये, असे होत नाही. लोकशाहीत प्रश्न विचारणे गैर नाही. आमच्या मंत्र्यांनाही प्रश्न विचारले जात आहेत. केवळ टीका केली म्हणून ती विरोध मानली जावी, हे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.

Neelam Gorhe Medha Kulkarni Jibe Shaniwarwada Namaz Row Government Behavior

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात