वृत्तसंस्था
पाटणा : Bihar Congress बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रचंड असंतोष उसळला आहे. तिकीट वाटपात पैशांची देवाणघेवाण झाली असा थेट आरोप पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केला असून, त्यामुळे महागठबंधनमधील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत.Bihar Congress
आनंद माधव, छत्रपती यादव, गजानंद शाही, नागेंद्र प्रसाद आणि रंजन सिंह यांनी एकामागोमाग एक राजीनामे सादर करत काँग्रेस नेतृत्वावर तीव्र हल्ला चढवला आहे. “या वेळेस काँग्रेसला दहा जागाही मिळणार नाहीत,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला.Bihar Congress
वादाचे मूळ ठरले खगडिया मतदारसंघातील तिकीटवाटप. या मतदारसंघातून छत्रपती यादव यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती; मात्र त्यांच्या ऐवजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य चंदन यादव यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे यादव यांनी थेट पक्षावर “तिकीट विक्रीचा” आरोप केला.
नेत्यांचा आरोप आहे की, “काही नेते आणि मध्यस्थांनी तिकीट देण्यासाठी पैसे घेतले; मेहनती आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली.”
महागठबंधनमधील समन्वयाचा अभावही समोर येत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) ने स्वतंत्रपणे सहा जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यामुळे काँग्रेससमोर आणखी अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
६ नोव्हेंबरला पहिला टप्पा, तर २० ऑक्टोबरपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत असल्याने सध्या बिहार काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पक्षातील बंडखोरीमुळे महागठबंधनची एकता धोक्यात आली असून, राजकीय जाणकारांच्या मते या गोंधळाचा थेट फायदा भाजप-एनडीएला होऊ शकतो.
राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की, “राहुल गांधींचे नेतृत्व प्रश्नचिन्हाखाली येत असताना, बिहार काँग्रेसची अंतर्गत फुट ही महागठबंधनच्या पराभवाची सुरुवात ठरू शकते.”
बिहार काँग्रेसचे हे “तिकीट वाद आणि बंडखोरी” प्रकरण सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असून, कार्यकर्ते खुलेआम नेतृत्वावर टीका करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App