विशेष प्रतिनिधी
पुणे : ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांन तिथे मोठे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांना जाग आली पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास काम चालविले, पण याच दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना नमाजींचा कळवळ आला आणि त्यांनी धर्मनिरपेक्षतेची दुहाई देत हिंदुऊ संघटनांच्या आंदोलनावर टीका केली.
सारसबागेत नमाज पठण केल्यानंतर तो विषय मोठा वादग्रस्त ठरला होता. तळ्यातल्या गणपती भोवती असलेल्या सारसबागेत नमाज पठण करणे त्यातून जातीय तेढ वाढविणे हा उद्देश होता. पोलिसांनी त्यावर नंतर कारवाई केली. त्या पाठोपाठ शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आला भाजपच्या खासदार महिला कुलकर्णी यांनी तो व्हिडिओ शेअर केला. मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवार वाड्यासमोर मोठे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांना जाग आली पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढचे तपास काम चालविले.
शनिवार वाड्यासारख्या ऐतिहासिक स्मारक असलेल्या वास्तूमध्ये धार्मिक कृत्य करणे गैर असताना तिथे नमाज पठण केले गेले. हे सगळे घडत असताना शनिवार वाड्यात अनेक लोक होते. परंतु कोणी तिथे नमाज पठण करणाऱ्या महिलांना अटकाव केला नाही. त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र नमाजी महिलांचा कळवळा आला.
भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्या रूपाली ठोंबरे आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी धर्मनिरपेक्षतेची दुहाई देत नमाजी महिलांचा मक्ता घेतला. ऐतिहासिक स्मारकात बेकायदा धार्मिक कृत्य केले याबद्दल या दोघांनाही काही वाटले नाही परंतु आपली मतपेढी सुरक्षित राहावी म्हणून त्यांनी शनिवार वाड्यातले नमाज पठण सुद्धा समर्थनीय ठरविले. उलट मेधा कुलकर्णीच जातीय तेढ वाढवत असल्याचा तिरपांगडा आरोप केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App