विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Shaniwarwada पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतितपावन संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिथे असलेली मजार काढण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आला आहे.Pune Shaniwarwada
शनिवारवाडा हा आमच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे या ठिकाणी ज्यांनी येऊन नमाज पठण केला आहे, त्या जागेचा शुद्धीकरण आम्ही शिववंदना करून करणार आहोत. असे काम करत असाल तर इथून पुढे खपवून घेतले जाणार नाही. येथे आम्ही आता शिव वंदना करण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत. येथे हिंदू धर्मच चालेल, असे खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे.Pune Shaniwarwada
पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शनिवार वाड्याच्या बाहेर घोषणाबाजी केली. ‘शनिवारवाडा स्वराज्याचा, नाही कोणाच्या बापाचा’, अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. आम्हाला नमाज पठन केल्याच्या ठिकाणी भगवा झेंडा लाऊ द्या, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. भगवा झेंडा हा देशाचे प्रतीक आहे. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी नांगर फिरवला होता, तिथे आम्हाला भगवा झेंडा लाऊ देत नाही? असा संतप्त सवाल महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. यावेळी मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या. भारतात भगवा झेंडा हाती घेण्याची अडचण वाटत असेल तर कुठे घेणार? असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
नमाज पठन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पतितपावन संघटनेसह त्या ठिकाणी जात गोमूत्र शिंपडत त्या जागेचे शुद्धीकरण केले. त्यानंतर पुन्हा आक्रमक होत वाड्यात असलेल्या मजारच्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्याची मागणी कार्यकर्त्यांनी व मेधा कुलकर्णी यांनी लाऊन धरली. परंतु, यावेळी पोलिसांनी त्यांना वाड्यात जाण्यापासून अडवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App