विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ‘ग्रँड मेळाव्या’साठी उपस्थित होते.Raj Thackeray
राज ठाकरे म्हणाले की, या निवडणुकीत 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले आहेत. मुंबईत 8 ते 10 लाख, ठाण्यात 8 लाख, असेच प्रत्येक जिल्ह्यात बोगस मतदार आहेत. 1 जुलै रोजी त्यांनी यादी बंद करून टाकली आणि त्यात हा गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. अशाप्रकारे निवडणुका होत असतील, तर हा राज्यातील जनतेचा आणि मतदारांचा अपमान आहे, असे ते म्हणाले.Raj Thackeray
निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’
राज ठाकरे म्हणाले की, मॅच फिक्सिंग झालेले आहे, तुम्ही मतदान द्या किंवा नको. मग सांगतात की, यांचा एक आमदार निवडून आला नाही, एक खासदार निवडून आला नाही. अरे कसा येणार, तुम्ही अगोदरच फ़िक्स करून ठेवले आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
विधानसभेच्या निकालानंतरचा ‘सन्नाटा’
राज ठाकरे म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतके मोठे आमदार निवडून आल्यानंतरही राज्यात सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका नव्हत्या, जल्लोष नव्हता. मतदार अवाक झाले होते, तर निवडून आलेलेही अवाक झाले होते. निवडून आलेल्यांनाही मी कसा निवडून आलो हे समजले नाही. यामुळे लोकांना कळाले की, देशात निवडणुका कशा झाल्या आहेत.
निवडणूक आयोग ‘सत्ताधाऱ्यांचा गुलाम’?
राज ठाकरे म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला बोलत आहोत तर सत्ताधाऱ्यांना राग येतोय, कारण त्यांनी शेण खाल्ले आहे. निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षांचा गुलाम नाही. मतदान यादी स्वच्छ होत नाही तो पर्यंत निवडणूका होऊच नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
भुमरेंच्या वक्तव्याचा दिला दाखला
राज ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे बेधडक बोलणे कसे सुरू आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी एका आमदाराचे (विलास भुमरे यांचे) उदाहरण दिले. भुमरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले होते की, त्यांनी बाहेरून 20 हजार मतदान आणले. बेधडक सत्ताधारी पक्षातील आमदार तुमच्या नाकावर टिच्चून बोलत आहात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App