विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sudhir Mungantiwar राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लाव रे व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, त्यांचा राजकीय भरती-ओहोटीचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे ते नवे आरोप करत असल्याची खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.Sudhir Mungantiwar
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचा मताधिकार काढण्यात आला, तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला काँग्रेसचा बटीक आहे असे म्हटले होते, मतदार यादी हा काही फक्त निवडणूक आयोगाचा अधिकार नाही, तुम्ही देखील ती यादी सदोष आहे निर्दोष आहे हे तपासू शकता असे मुनगंटीवार म्हणाले.Sudhir Mungantiwar
निवडणूक आयोग एकटा मतदार नोंदणी करु शकत नाही
पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले, तेव्हा तुम्ही असे म्हणाला होता की केंद्रात मनमोहन सिंग यांनी आणि राज्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी बोगस मतदार नोंदणी होऊ दिली. निवडणूक आयोग एकटा मतदार नोंदणी करु शकत नाही, अगदी तलाठ्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत हजारो लोक या प्रक्रियेत सामील होतात. त्यामुळे निवडणूक आयोगातील एखाद्या अधिकाऱ्याला वाटले देखील की आपण कुठल्या विशिष्ट पक्षाला मदत करावी, तर या प्रक्रियेत असलेले हजारो लोक हा विचार तिथेच ठेचून टाकतील, त्यामुळे हजारो लोक मिळून हे षड्यंत्र करत आहेत असे म्हणणे गोबेल्सला देखील शक्य झाले नसते.Sudhir Mungantiwar
जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा
जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पत्रकार परिषद घेऊन त्याने फक्त खमंग बातम्या होतील दुसरे काही होणार नाही. तुमच्याकडे जर योग्य पुरावे असतील तर सुप्रीम कोर्ट योग्य ते निर्देश देईल पण सगळी यंत्रणाच भ्रष्ट आहे असे म्हणणे काही योग्य नाही. आंदोलन करणे प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. पण निवडणूकच होऊ देणार नाही असे म्हणणे म्हणजे काय? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निवडणूक पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग देखील यामध्ये काही करु शकत नाही, तुमच्याकडे जर ठोस पुरावे असतील तर कोर्टात जा आणि 31 जानेवारी पर्यंत निवडणूक पूर्ण करण्याचे जे आदेश आहे ते रद्द करा, सरकार काही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाहेर जाऊ शकत नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App