विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jayant Patil राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने याबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे. आता 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Jayant Patil
आज विरोधी पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो, ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत. आम्ही आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जे उत्तर दिले ते समाधानकारक नाही. सत्तेत असलेले नेते जर मोर्चात सहभागी झाले तर त्यांना कोणाची ना नाही, पण ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते या मोर्चात सहभागी होणार नाहीत. येत्या 1 तारखेला आमचा मोठा मोर्चा निघेल. या मोर्चात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचा या मोर्चात सहभाग आणि पाठिंबा असेल, असे जयंत पाटील म्हणाले.Jayant Patil
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, दुबार मतदार यादी काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार, मतदार यादीत ज्यांचे पत्ते नाहीत, त्यांचे तुम्ही काय करणार आहात? याबाबतचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. कारण, निवडणूक आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. तसेच, महाराष्ट्रात लोकशाहीबद्दल आस्था आहे, त्यांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
निवडणूक आयोग थातुरमातूर उत्तर देतंय – बाळा नांदगावकर
मनसे नेते बाळा नांदगावकर देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. निवडणूक आयोगावर आरोप करताना ते म्हणाले, मतदार यादीमधील घोळ ही भावना लोकांच्या मनात आहे, स्वतः आमदार सुद्धा ते बोलताय. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिले होते, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. याचा अर्थ त्यांना कळले की घोळ झाला आहे. आता ते थातूरमातुर उत्तर देत आहेत. निवडणूक आयोगाला लक्षात आले आहे की, याच्यात घोळ झाला आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले. तसेच, 1 नोव्हेबंर रोजीच्या मोर्चात आम्ही पक्षाच्या वतीने सहभागी होऊ, असेही नांदगावकर यांनी म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोग हे सरकारचे गुलाम- संजय राऊत
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. त्यांनी देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ते म्हणाले, राज्य निवडणूक आयोग हे सरकारचे गुलाम आहे, त्यामुळे त्यांच्याकडून फार अपेक्षा नाहीत. मात्र, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आवाज उठवला पाहिजे. या मोर्चाचा रूट हे, ते सगळे पक्ष मिळून ठरवतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवार या सगळ्या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App