विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि बोगस मतदारांची नावे असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली.Sanjay Raut
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीत विरोधकांनी मतदारयाद्यांमधील त्रुटी आयोगासमोर मांडल्या. मात्र, आपले समाधान झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार असल्याचा मोठा दावा केला. यानंतर सर्वपक्षीय विरोधकांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत निवडणूक आयोगाविरोधात मुंबई मोर्चा काढणार असल्याची घोषणा संजय राऊत यांनी केली.Sanjay Raut
आयोगाच्या घोटाळ्यांबाबत लढाई सुरू
संजय राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांबाबत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष एक लढाई लढत आहेत. ही लढाई राहुल गांधींच्या नेतृत्वात दिल्लीत लढतोय. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही लढाई सुरू झालेली आहे. या लढाईतून काय निष्पन्न होईल याविषयी शंका आहे.
शहांनी आधी महाराष्ट्रातील घुसखोर बाहेर काढावेत
आजच राज ठाकरे यांनी दोन मुद्दे मांडले. मतदार करा किंवा करू नका, निवडणुकीचे मॅच फिक्सिंग झालेले आहे. या मॅच फिक्सिंगविरुद्ध आपली लढाई आहे. महाराष्ट्राच्या यादीत 96 लाख बोगस मतदार आजही आहेत. हे मतदार मतदार आमच्या दृष्टीने घुसखोरच आहेत. या घुसखोरांना यादीतून बाहेर काढणे ही लोकशाहीची गरज आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना आम्ही घुसखोरांना शोधू आणि त्यांची नावे मतदार यादीतून बाहेर काढू, असे सांगितले. त्यामुळे अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत घुसलेले एक कोटी मतदारांना आधी बाहेर काढावे आणि त्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रापासून सुरुवात करावी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
आयोगाने गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केलंय
महाराष्ट्रात निवडणूक याद्यांमध्ये घोटाळा करून महायुती सत्तेवर आलेली आहे. मतदार याद्याला पवित्र आणि शुद्ध असायला हव्यात, यासाठी हा संघर्ष आहे. निवडणूक स्वच्छ आणि पारदर्शक असायला हव्यात, यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी वगळून सर्व प्रमुख पक्ष लढत आहेत. दोन दिवस सातत्याने निवडणूक आयोगाकडे बैठका झाल्या. आम्ही मांडलेल्या आमच्या भूमिका मानायला निवडणूक आयोग तयार नाही. आमच्या याद्या निर्दोषच असल्याचे ते म्हणत आहेत. निवडणूक आयोगाने गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केलेले आहे. निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर त्यांना दणका द्यावाच लागेल आणि तो रस्त्यावर उतरून द्यावा लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
पंतप्रधान-आयोगाला मतदारांची ताकद दाखवली जाईल
या एक नोव्हेंबरला शनिवारी निवडणूक आयोगाच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यातून गावा गावातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत, आणि मतदारांची ताकद देशाच्या पंतप्रधानांना आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील अशी माहिती यावेळी संजय राऊत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App