विशेष प्रतिनिधी
बीड : Pankaja Munde बीड जिल्ह्यात नुकताच झालेला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा गाजला. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी सरकारवर आणि विशेषतः मराठा आरक्षणाच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. भुजबळांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र टीका केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या भाषणाविषयी विचारले असता, पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. मी त्यांची भाषणे पाहिली नाहीत, थोड्या वेळाने पाहील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच भुजबळ साहेबांनी त्यांची बाजू मांडली असावी, असेही त्या म्हणाल्या.Pankaja Munde
बीडमध्ये ओबीसी समाजाने मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारी निर्णयाला विरोध करत ‘महाएल्गार मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या तिखट टीकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे या मेळाव्यात अनुपस्थित होत्या.Pankaja Munde
नेमके काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
याच मेळाव्याबाबत पंकजा मुंडेंना पत्रकारांनी विचारले असता, मला अजून भाषणे पाहायला वेळ मिळाला नाही. थोड्याच वेळात पाहीन. भुजबळ साहेबांनी याआधीही असे मेळावे घेतले आहेत, त्यांनी आपली बाजू मांडली असावी, अशी संतुलित प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी केलेल्या “अंगावर आले की शिंगावर घ्या” या व्यवक्त्यावर प्रतिक्रिया दिली. कोणत्याही भाषणावर मी बोलत नाही. बोलू शकते, पण बोलत नाही. मी कधीच दुसऱ्यांच्या भाषणावर टिप्पणी करत नाही. ते चांगले वक्ते आहेत, त्यांनी चांगले काय बोलले ते मला सांगा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंकडून अनाथ आश्रमात दिवाळी साजरी
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज मुंबईतील एका अनाथ आश्रमात जाऊन तेथील लहान मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या भेटीदरम्यान त्यांनी सामाजिक ऐक्याचा संदेश देत, “ही मुले आई-वडिलांविना वाढत आहेत. त्यांना कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची ही जाणीवच नाही. पण आपण मात्र स्वार्थासाठी जातपात आणि धर्माच्या भिंती उभ्या करतो. पुढच्या पिढीसमोर आपण चांगला आदर्श ठेवला पाहिजे,” असे सांगत समाजाला विचार करायला लावणारा संदेश दिला. त्या पुढं म्हणाल्या, आम्ही आधीच लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला लोक फॉलो करतात. त्यामुळे समाजासमोर चांगला संदेश जाणं हे आमचं कर्तव्य आहे. जात-पात, धर्म, वाद यापलीकडे जाऊन आपण माणुसकीचा सण साजरा करायला हवा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App