नाशिक : पवार + काँग्रेस साजरी करायला सांगताहेत काळी दिवाळी; ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कवर केली फटक्यांची आतषबाजी; याला म्हणतात, महाविकास आघाडी!!, अशी राजकीय विसंगती आता समोर आलीय. निवडणूक आयोगासमोर रडगाणे गायला एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी एकमेकांच्या विरोधात राजकीय वर्तणूक केली. Thackeray brothers
– अतिवृष्टीमुळे नुकसान
महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली. उभी पिके आडवी झाली. शेतजमीन खरडून गेली. ऐन सणासुदीच्या दिवसांत शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी राज्यात दौरे काढून अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्यमंत्री आणि मंत्री शेतांच्या बांधावर गेले. त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करून तातडीने काही विशिष्ट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. 32000 कोटींचे मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्यातली काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा सुद्धा केली.
– पवार + काँग्रेसचे आव्हान
पण शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रुपये ते एक लाख रुपये मदत देण्याची गरज असताना फडणवीस सरकारने किरकोळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. म्हणून शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ काळी दिवाळी साजरी करावी. ऐन सणासुदीच्या दिवशी घरात चालू असलेले दिवे एक तास बंद करून ठेवावेत, अशी सूचना काँग्रेसच्या नेत्यांनी केली. शरद पवारांनी सुद्धा पवार कुटुंबीय खासगी कारणामुळे एकत्र दिवाळी करणार नाहीत शेतकऱ्यांनी सुद्धा काळी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन केले.
– ठाकरे बंधूंची आतषबाजी
एकीकडे काँग्रेसचे नेते आणि शरद पवार शेतकऱ्यांना काही दिवाळी साजरी करायचे आवाहन करत असताना दुसरीकडे मात्र उद्धव आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी मनुष्याच्या दीपोत्सवात मुंबईच्या शिवाजी पार्कवर मोठी आतषबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी तिथे 55 शब्दांचे भाषण केले. त्याचे शब्दशः वर्णन करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले, दोघांची कुटुंबे एकत्र आली, त्याबद्दल मराठी माध्यम आणि त्यांच्या आरत्या ओवाळल्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शिवाजी पार्क वरच्या आतषबाजीचे लाईव्ह चित्रीकरण केले. पण कुठल्याही मराठी माध्यमांनी एकीकडे शरद पवार आणि काँग्रेस शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करायला सांगत असताना तुम्ही कशी काय दिवाळीची आतषबाजी साजरी करताय??, असा सवाल ठाकरे बंधूंना विचारला नाही.
– मराठी माध्यमे दुटप्पी
उद्धव ठाकरे यांनी काल सकाळीच मातोश्रीवर जमलेल्या शिवसैनिकांना शुभेच्छा देताना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विषय काढला होता. प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता येत नाही असे ते म्हणाले होते. शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने एक लाख रुपये जमा करा, अशी मागणी फडणवीस सरकारकडे केली होती. पण सायंकाळी मात्र ते मनसेच्या दीपोत्सवाच्या आतषबाजीत आपलेच सकाळचे वक्तव्य विसरून सामील झाले. पण उद्धव ठाकरे यांच्या या विसंगत वर्तनाविषयी सुद्धा मराठी माध्यमांनी सवाल उपस्थित केला नाही. पण म्हणून महाविकास आघाडीतली राजकीय विसंगती सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आल्याशिवाय राहिली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App