विशेष प्रतिनिधी
बीड : Chhagan Bhujbal विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या महाएल्गार सभेत बोलताना केली आहे. तसेच विखे पाटील हे गरज नसताना मनोज जरांगेंकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे आहे की तुमच्या लोकांना आवरा. मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.Chhagan Bhujbal
जे ओबीसीच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करा
छगन भुजबळ म्हणाले, आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. हिशोब करा राज्यात 54 टक्के ओबीसी,13 टक्के दलीत, 7 टक्के आदिवासी, 3 टक्के ब्राह्मण त्यानंतर मुस्लिम आणि जे शिल्लक राहतात तो मराठा समाज, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. तसेच आता दुहेरी लढाई लढणार, एक न्यायालयात आणि दुसरी रस्त्यावरची लढाई. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो नाही. इथे फक्त ओबीसीसाठी लढा देत आहोत. पक्षाचे काम आल्यावर आम्ही त्यासाठी लढू. जे जे ओबीसीच्या मुळावर उठले असतील त्यांना आडवे करा, असा इशारा भुजबळ यांनी दिला.Chhagan Bhujbal
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे, सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे की, मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही असे भुजबळ म्हणाले. भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, ओबीसीच्या ताकदीवर तुम्हाला 145 आमदार मिळाले आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढा असे भुजबळ म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांच्यावर भुजबळांची टीका
भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील टीका केली. नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे. तुम्ही सांगितले होते तुमच्याबरोबर आहे. मग तुम्ही का नाही आलात ? असा सवाल भुजबळांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App