विशेष प्रतिनिधी
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत अनुभवला विविध क्रीडा स्पर्धांचा थरार आणि स्वतः खेळले काय तर कॅरम!!, हा प्रकार आज समोर आला.
अजित पवार यांनी बारामतीतील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदानगर शैक्षणिक संकुल आणि एडीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे भेट दिली. यावेळी विविध खेळांच्या स्पर्धांचा थरार अनुभवत उत्साहानं खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या जिद्दीचं आणि खेळाडू वृत्तीचं मनापासून कौतुक केले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांना दिवाळी वसुबारसेच्या शुभेच्छा दिल्या. अजितदादांनी स्वतः तिथले फोटो आपल्या सोशल मीडिया हँडल वर शेअर केले.
ऑलिंपिक संघटनेची निवडणूक
अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. 60 पेक्षा अधिक क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहेत. आतापर्यंत अजित पवारांना ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने कुठल्या आव्हानच निर्माण झाले नव्हते, ते आव्हान भाजपने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवडणुकीत उतरवून निर्माण केले आहे. स्वतः मुरलीधर मोहोळ हे कुस्तीगीर आहेत त्यांनी कोल्हापूर म्हणून रीतसर कुस्तीचे प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य स्तराच्या स्पर्धा गाजविल्यात. पण अजित पवार हे कुठल्या खेळात प्रवीण असल्याचे दिसले नाही पण त्यांनी क्रीडा क्षेत्रातल्या राजकारणात मात्र मनापासून रस घेतला आणि जेव्हा कुठलेही आव्हान नव्हते तेव्हा ऑलिंपिक संघटनेच्या राजकारणात भाग घेऊन अध्यक्ष पद मिळविले होते.
हेच अजित पवार बारामतीतल्या शारदा क्रीडा संकुलात विविध खेळांच्या स्पर्धा पाहण्यात रमले. तिथे त्यांनी विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचा थरार अनुभवला आणि स्वतः मात्र कॅरम खेळले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App