विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पक्ष संघटनेची रचना जरी मूळच्या शिवसेनेच्या धर्तीवर असली तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सूत्रे मात्र त्यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपविल्याची चिन्हे दिसली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उत्तर महाराष्ट्र निहाय विभाग आढावा बैठक घेतली या बैठकीत बाकीच्या नेत्यांबरोबर श्रीकांत शिंदे ची जागा मुख्य खुर्चीवर ठेवण्यात आली होती. Shrikant Shinde
श्रीकांत शिंदे हे फक्त दुसऱ्या टर्मचे खासदार असले तरी ते एकनाथ शिंदे यांचे पुत्र असल्याने त्यांचे शिवसेनेतले महत्त्व वाढत चालले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये पाठविलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व एकांत शिंदे यांच्याकडे सोपविले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेल्या भेटीत मोदींनी श्रीकांत शिंदे यांना मेरे छोटे भाई म्हणून संबोधले होते. याचा राजकीय फायदा उठवत शिंदे यांना पक्षाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यायला सांगितले त्यानुसार त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घालून विभागवार बैठका घ्यायला सुरुवात केली.
श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मुंबई येथे उत्तर महाराष्ट्र विभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्या नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी, तळागाळातील लोकांपर्यंत सरकारच्या योजना आणि विकासकामे पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करण्याच्या यावेळी सूचना करण्यात आल्या. पक्षाच्या माध्यमातून या विभागांमध्ये सुरू असलेल्या कामांचा देखील यावेळी आढावा घेतला. तसेच आगामी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन ही यावेळी करण्यात केले.
यावेळी मंत्री दादाजी भुसे, गुलाबराव पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, राम रेपाळे यांच्यासह या विभागातील सर्वश्री आमदार महोदय, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App