विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai एसटी को-ऑपरेटिव बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जात होती. परंतु सध्या ह्या बँके बाबत नेहमीच काही ना काही विचित्र ऐकायला येते. भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेले संचालक मंडळ कामगारांच्या मेहनतीच्या पैशांवर मौज करत आहे. याचे अनेक उदाहरणे आजवर आपण बघितलेत.Mumbai
आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली. त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत चालवलेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या मीटिंगमध्ये अक्षरशा फ्रीस्टाइल मारामारी बघायला मिळाली. संचालक मंडळाच्या सदावर्ते गटाने अक्षरशः बाहेरून बाया बोलवून त्यांच्या हातून संचालक मंडळाच्या अडसूळ गटाला तुफान मारहाण केली, शिव्यांचा अक्षरशः पाऊसच पडला, कपडे फाडले, लाथा बुक्क्यांनी तुडवले. संचालकांचा हा राडा आता पोलिस स्टेशनपर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे.Mumbai
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मुंबई एसटी बँकेच्या संचालकांची बैठक होती. या बैठकीला गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचे सगळेच संचालक आणि अडसूळ यांच्या संचालकीय पॅनलमधील सदस्य उपस्थित होते. सदावर्ते यांच्या पॅनलने आमच्या महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप करत अडसूळ संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना टेबलवरील पाण्याची फेकून मारहाण करण्यात आली. ही मारहाण झाल्यानंतर मोठा राडा झाला. या राड्यानंतर बँकेंच्या संचालकांची बैठक रद्द झाली. या राड्यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी दोन्ही गट नागपाडा पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. पोलिसांनी दोघांची तक्रार लिहून घेतली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
सदावर्तेंनी भ्रष्टाचार केला, अडसूळांचा आरोप
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या बँकेमध्ये सदावर्तेंनी जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही बँक सुरक्षित वाटत नाही. या बँकेत 125 कर्मचाऱ्यांची भरती ही पैसे घेऊन करण्यात आली आहे. या बँकेच्या 12 कोटीच्या सॉफ्टवेअरसाठी सदावर्तेंच्या गटाने 52 कोटी दिले आहेत. या सगळ्या गोष्टी आता समोर येत असल्याने त्यांचे पित्त खवळले. त्यामुळेच सदावर्तेंनी बाहेरची माणसे बैठकीत आणले आणि त्यांनी हा राडा घातला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या प्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.”
महिलांचा अपमान केल्याचा आरोप
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एका सदस्याने सांगितले की, काही लोकांनी आमिषे दाखवून आमचे संचालक फोडून नेल्यानंतर हा वाद जास्त झाला. बँकेच्या निमित्ताने राजकीय पक्षाचे काही लागेबांधे आले आणि नऊ संचालक वेगळे राहिले. आज बँकेतील कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी आमची बैठक होती. शांततेत बैठक सुरू असताना, काही विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. जातीवाचक बोलले, त्यामुळे हा वाद निर्माण झाला. आमच्या महिलेचे कपडे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आले. वारंवार त्या संचालकांकडून महिलांचा अपमान होतो, असा आरोप या सदस्याने केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App