Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगे यांना इशारा- आमचे 2% काढणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही; वंजारी समाज ST मध्ये असल्याचा पुनरुच्चार

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर :Dhananjay Munde  वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे.Dhananjay Munde

अहिल्यानगरच्या पाथर्डी – शेवगाव येथे वंजारी समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी या तरुणांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी तरुणांनी धनंजय मुंडे यांच्याशी बोलणे करून देण्याचा आग्रह धरला. त्यावर ढाकणे यांनी थेट धनंजय मुंडे यांना फोन लावला. त्यानंतर मुंडे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मनोज जरांगे यांना आमचे दोन टक्के काढून घेण्याची वल्गना करणाऱ्यांना टक्क्याही ठेवणार नाही असा इशारा दिला.\Dhananjay Munde



आमचे 2 टक्के काढणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही

धनंजय मुंडे म्हणाले, हैदराबाद गॅझेटियर समोर आले नसते, तर आपण वंजारी समाज केवळ पाथर्डीमध्येच नाही तर, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांतही एसटीएमध्ये आहोत हे कळलेच नसते. आम्हाला अगोदरच माहिती होते की, आपण एसटीमध्ये आहोत. कारण, परळी हे तेलंगणाच्या सीमेजवळ येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे होते तेव्हापासून सर्वांना माहिती आहे की, आपले अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत आणि आपण इकडे व्हीजेएनटीमध्ये आहोत.

पण आता हैदराबाद गॅझेटियरनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटियरमधील एकेका शब्दाचा कुणाला फायदा होत असेल, तर तो आम्हाला देखील झाला पाहिजे. कारण, आपले 2 टक्क्यांमध्ये बरे चालले होते. पण आता काहीजण हे दोन टक्के काढण्याची भाषा करत आहेत. जे लोक अशी भाषा करत आहेत, त्यांना सांगतो आम्ही तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही. आता आम्हाला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण हवे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

सरकार वंजारी समाजाच्या पाठिशी

धनंजय मुंडे यांनी यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही देत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. सरकार आपल्यासोबत आहे. ते आपले काहीही नुकसान करणार नाही. सरकारवर विश्वास ठेवा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही पाथर्डीत येऊन तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांचा व सरकारचा मान ठेवून आपले उपोषण स्थगित करा, असे ते म्हणाले. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची मागणी केली होती.

Dhananjay Munde’s Fiery Warning to Manoj Jarange: ‘Will Not Let You Remain in a Percentage If You Touch Our 2% Quota’; Reasserts Vanjari as ST

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात