बिहारमध्ये निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा; पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडविला!!

Prashant Kishor

नाशिक : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप – जदयू महायुती आणि विरोधी काँग्रेस – राजद महागठबंधन यांच्यात पारंपरिक लढत असली, तरी त्यामध्ये पहिल्यांदाच एका निवडणूक रणनीतीकाराची स्वतःचीच परीक्षा होत आहे. या निवडणूक रणनीतीकाराने या परीक्षेतला पहिला प्रश्न तरी इतरांच्या आधी सोडवून पहिल्या यादीत 116 उमेदवार जाहीर करून टाकलेत. या यादीत त्यांनी सामाजिक संतुलन राखायचा प्रयत्न केलाय. 116 पैकी 91 उमेदवार जनरल कॅटेगिरीचे, 25 उमेदवार आरक्षित, 31 उमेदवार ईबीसी, 21 उमेदवार ओबीसी, तर 21 उमेदवार मुस्लिम, अशा पद्धतीने प्रशांत किशोर यांनी पहिल्या यादीतील राजकीय + सामाजिक मांडणी केली आहे.Political strategiest Prashant Kishor himself facing political examination

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पहिल्यांदाच बिहारच्या निवडणुकीत स्वतःच्या जनसुराज्य पक्षाच्या ताकदीवर उभे राहिलेत. त्यांनी स्वतःचे उमेदवार उतरवायचा निर्णय घेतलाय. भाजप – जदयू महायुती आणि काँग्रेस – राजद महागठबंधन यांच्या आधीच प्रशांत किशोर यांनी 116 उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांचे उमेदवार अजून ठरायचे आहेत.



– इतरांचे रणनीतीकार आता स्वतःच मैदानात

प्रशांत किशोर यांनी आत्तापर्यंत भाजप पासून काँग्रेस पर्यंत अनेक पक्षांना निवडणूक रणनीती आखून द्यायला आणि ठरवायला मदत केली त्या त्या पक्षांना असाइनमेंट नुसार देशात आणि राज्यांमध्ये जिंकून दिले. क्वचितच उत्तर प्रदेश सारख्या राज्यात काँग्रेसला जिंकून देण्यात प्रशांत किशोर यांना अपयश आले. कारण त्यांची रणनीती काँग्रेसने तिथे फारशी अवलंबलीच नाही. त्यांचा फक्त सल्ला घेतला, पण तो अंमलात आणताना तो 100 % पाळला नाही. पण प्रशांत किशोर यांनी सर्वसाधारणपणे इतर पक्षांना निवडणूक रणनीती ठरवून देण्यात professionalism पाळला. एखाद्या पक्षाचे काम घेतल्यानंतर ते व्यवस्थित पार पाडले.

self assignment

पण 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी अन्य कुठल्या पक्षाची assignment किंवा contract करण्यापेक्षा स्वतःलाच assignment घेतली. त्यांनी स्वतःच जनसुराज्य पक्षाची रणनीती आखून निवडणुकीच्या मैदानात आपले उमेदवार उतरवलेत. एखाद्या पक्षाची रणनीती ठरवून त्या पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी मदत करणे निराळे आणि स्वतःच एखाद्या पक्षाची संघटना बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरणे आणि ते रण मैदान मारणे निराळे. या दोन्ही भिन्न भिन्न बाबी आहेत. पण प्रशांत किशोर यांनी आता स्वतःचीच रणनीती जनतेमध्ये कशा पद्धतीने चालेल हे अजमावायचे ठरविले आहे.

परीक्षेचा निकाल 14 नोव्हेंबरला

प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी किमान दोन-तीन वर्षे संपूर्ण बिहार पिंजून काढला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन जनसुराज्य पक्षाची बांधणी करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये शक्यतो नवीन कार्यकर्ते घेतले. लोकांचे मुद्दे उचलायचा प्रयत्न केला. जे मुद्दे सर्वसाधारणपणे सत्ताधारी किंवा विरोधक उचलणार नाहीत अशा मुद्द्यांना हवा द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी पठाडीबाज पक्षांसारखा मुस्लिम तुष्टीकरणाचा सुद्धा प्रयत्न केला. तो त्यांच्या रणनीतीचा विशिष्ट भाग ठरला. पण या सगळ्याची परीक्षा मात्र बिहार विधानसभा निवडणुकीत होणार असून तिचा निकाल 14 नोव्हेंबरला लागणार आहे. त्याच दिवशी हे ठरेल, की प्रशांत किशोर हे फक्त इतर पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार म्हणून यशस्वी झालेत, की ते स्वतःच्या पक्षासाठी सुद्धा उत्तम रणनीती बनवून निवडणूक जिंकू शकतात ते. 14 नोव्हेंबरच्या निकाल प्रशांत किशोर यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

Political strategiest Prashant Kishor himself facing political examination

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात