विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीत चौथा भिडू नको असे म्हणून काँग्रेसने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झिडकारले, पण तरी देखील संजय राऊत यांनी मनसेचा महाविकास आघाडीत समावेश करण्याचा आग्रह धरला. किंबहुना त्यांनी त्यासाठी खुद्द राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा आधार घेतला.
महाविकास आघाडीत आधीच तीन घटक पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये चौथा घटक पक्ष नको, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज ठाकरेंच्या आघाडीतल्या प्रवेशाला नकार दिला. कारण राज ठाकरे यांच्या मनसेची हिंदी भाषकांच्या विरोधातली भूमिका काँग्रेसची मते घालवेल, अशी त्यांना भीती वाटली त्याचबरोबर महाविकास आघाडीत मनसेच्या समावेश झाल्यानंतर जागावाटप करताना अधिक अडचणी येतील.
सगळ्याच घटक पक्षांची political space जास्त मर्यादित होईल ही शक्यता लक्षात घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीत मनसेच्या प्रवेशाला नकार दिला पण त्याचवेळी त्यांनी या संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीत होईल असे सांगून safe game ही केला.
पण संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत मनसेच्या प्रवेशाचा आग्रह धरला. खुद्द राज ठाकरे यांचे सुद्धा मत काँग्रेसला बरोबर घेण्याचेच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्या पक्षांना विशिष्ट राजकीय स्थान आहे. त्यात काँग्रेसचा सुद्धा समावेश होतो, असे राज ठाकरे म्हणाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडीत मनसेच्या प्रवेशाबाबत आपण के सी वेणुगोपाल राहुल गांधी यांच्याशी बोलू, असेही संजय राऊत म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ आणि संजय राऊत यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यांनी महाविकास आघाडीतला मनसेचा प्रवेश राखडला. शिवाय आम्ही दिल्लीला जुमानणार नाही असे म्हणणारे ठाकरेंचे वारस राजकीय दृष्ट्या दिल्लीकडूनच निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचे स्पष्ट झाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App