विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar आमदार संग्राम जगताप यांनी केलेले वक्तव्य हे पक्षाच्या विचारधारेला धरून नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी नोटीस देखील काढली असल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सदस्य असाल, सभासद असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेबद्दल काहीही बोलायला लागलात तर कोणताही पक्ष सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.Ajit Pawar
नोटीस काढल्यावर त्याला प्रतिक्रिया असते. त्या नोटीसला काय उत्तर येते ते उत्तर आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे अजित पवार म्हणाले आहेत. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पूरग्रस्त भागात मोठ्या लहान उसाचे नुकसान झाले आहे. त्या संदर्भात पुढची कार्यवाही काय करायची याची माहिती देण्यात आली आहे. साखर कारखान्यांना याबाबतची सर्व माहिती दिली जाणार आहे. कोणताही निर्णय झाला तरी वेगवेगळे मतप्रवाह असतात, असेही पवारांनी म्हटले आहे.Ajit Pawar
काय म्हणाले होते संग्राम जगताप?
अहिल्यानगर येथे गुरुवारी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना संग्राम जगताप म्हणाले, दिवाळीला हिंदू लोकांनी केवळ हिंदू दुकानदाराकडून खरेदी करावी, दिवाळीचा नफा केवळ हिंदूंनाच मिळाला पाहिजे, असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून त्यांना अजित पवारांनी नोटीस पाठवली आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी झालेल्या सभेत बोलताना भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली होती. नितेश राणे यांना छोटा चिंटू म्हणत डिवचले होते. तर आमदार जगताप यांना चिकणी चमेली म्हणत खोचक टोला लगावला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना संग्राम जगताप यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चात वादग्रस्त विधान केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App