विशेष प्रतिनिधी
कोलकाता: Mamata Banerjee पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूर येथील वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणावर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री म्हणाल्या —“मुलींनी रात्री कॉलेजच्या बाहेर जाऊ नये, त्यांनाही स्वतःचे रक्षण करावे लागेल.”Mamata Banerjee
या विधानाने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा पेट घेतला असून, विरोधक आणि महिला हक्क संघटनांनी बॅनर्जी यांच्यावर ‘पीडितेला दोष देण्याचा’ आरोप केला आहे.Mamata Banerjee
ही धक्कादायक घटना १० ऑक्टोबरच्या रात्री दुर्गापूर येथील IQ सिटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलजवळील झाडीमध्ये घडली. २० वर्षीय विद्यार्थिनी, जी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे, ती आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी बाहेर गेली असताना पाच अज्ञात तरुणांनी त्यांना अडवून बलात्कार केला.Mamata Banerjee
पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपु बौरी (२१), फिरदोस शेख (२३) आणि शेख रेजुद्दीन (३१) या तिघांना अटक केली असून शेख सोफिकुलला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांनी बॅनर्जी यांच्यावर “संवेदनशील प्रकरणावर असंवेदनशील प्रतिक्रिया देऊन महिलांच्या सन्मानावर आघात केल्याचा” आरोप केला आहे. महिला संघटनांनी तर बॅनर्जींच्या विधानाला “लज्जास्पद, धोकादायक आणि प्रशासनाकडून चुकीचा संदेश देणारे” म्हटले आहे.
ही पहिली वेळ नाही की ममता बॅनर्जी अशा विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.२०१२ च्या पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणात, त्यांनी ती घटना “शाजानो घटना” म्हणजेच बनावटी असल्याचे म्हटले होते. २०१३ मध्ये, राज्यातील वाढत्या बलात्कारांच्या प्रकरणांवर चर्चा करताना त्यांनी “लोकसंख्या वाढ, मॉल्स आणि मल्टिप्लेक्समुळे गुन्हे वाढतात” असे विधान केले होते. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
विरोधकांनी ममता बॅनर्जी यांनी आपले विधान मागे घ्यावे आणि पीडितेची सार्वजनिक माफी मागावी, अशी जोरदार मागणी केली आहे. राज्यभरात महिला संघटनांनी निदर्शने सुरू केली असून, “महिलांवर अन्याय थांबवा, दोषींचे समर्थन नव्हे तर शिक्षा करा!” अशी घोषणाबाजी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App