नाशिक : एकीकडे अजितदादांची स्वबळाची तयारी; पण आमदार संग्राम जगताप यांना आवरता येई ना म्हणून झाली गोची!!, अशी अवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय.On one hand, the NCP is preparing for self-reliance; but Ajit’s bluff is not to be stopped by MLA Sangram Jagtap!!
महापालिका, जिल्हा परिषदा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आली. ती प्रफुल्ल पटेल आणि अनिल भाईदास जगताप यांच्या तोंडून बाहेरही पडली. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद एवढी तोकडी की त्यांना पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद पुणे महापालिका किंवा पिंपरी चिंचवड महापालिका यापलीकडे फारसे स्थानही नाही. अजित पवारांचे जे 41 आमदार निवडून आले, ते भाजप महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला आल्यामुळे शक्य झाले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत तरुन जाता आले. अन्यथा लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धोबीपछाड देत 5 पैकी 4 जागांवर हरविलेच होते. फक्त सुनील तटकरे यांना अजितदादा लोकसभेत पोहोचवू शकले होते.
स्वबळाचा रेटा, पण…
पण आता भाजपनेच महायुतीत स्वबळाचा रेटा लावल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा स्वबळावर निवडणूका लढविण्या वाचून पर्याय उरला नसल्याचे चित्र समोर आले. म्हणूनच प्रफुल्ल पटेल आणि अनिल भाईदास पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढू अशी वक्तव्ये केली. पण अशी स्वबळाची खुमखुमी आणलेल्या अजितदादांना आमदार संग्राम जगताप यांना वेसणही घालता येई ना. संग्राम जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पारंपारिक विचारसरणीच्या विरोधात जाऊन थेट आक्रमक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. या दिवाळीत हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करा अशी भूमिका जाहीर केली त्यांनी अहिल्यानगर आणि करमाळ्यात जाऊन तशी भाषणे केली. त्यावर अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या भाषणांवर नाराजी व्यक्त करून त्यांना नोटीस पाठविण्याची भाषा वापरली. परंतु, अजित पवारांच्या नोटीशीला संग्राम जगताप यांनी किंमत दिली नाही. त्यांनी अहिल्यानगर मध्ये demographic jihad या विषयावर भाषण करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सोडली नाही.
संग्राम जगताप फायद्यात, अजितदादा तोट्यात
याच दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना संग्राम जगताप यांना पक्षातून काढून टाकण्याचा इशारा दिला. संग्राम जगताप संविधानाच्या विरोधात बोलतात. अजित पवारांना त्यांना आवरता येत नाही. त्यांना नुसती नोटीस देऊन भागणार नाही तर त्यांना पक्षातून काढून टाकले पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यातून अजित पवारांच्या पक्षात आमदाराची वजाबाकी झाली तर त्यात आपलाच फायदा होईल अशी अटकळ त्यांनी बांधली. पण अजित पवारांनी फक्त नोटिशीच्या भाषेवरच संग्राम जगताप यांची सध्यातरी बोळवण केली. कारण संग्राम जगताप यांना आवरणे हा अजितदादांचा घास उरलेला नाही. अजितदादांनी संग्राम जगताप यांना पक्षातून बाहेर काढले तरी भाजप किंवा शिवसेनेचा पर्याय त्यांच्यापुढे शिल्लकच राहतो. तसेही संग्राम जगताप यांच्याकडे अहिल्या नगरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ आहे. शिवाय आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते सुद्धा त्यांच्याबरोबर काम करू लागलेत. त्यामुळे एकटे अजित पवार संग्राम जगताप यांना वेसण घालू शकणार नाहीत. आणि अजित पवारांनी संग्राम जगताप यांना वेसण घातली, तरी त्याचा अजित पवारांना फायदा होण्याच्या ऐवजी संग्राम जगताप यांनाच फायदा होईल आणि अजितदादांना एक आमदार गमवावा लागेल, त्या पलीकडे काही होणार नाही.
अशी झाली गोची
हे सगळे अजितदादांना राजकीय दृष्ट्या व्यवस्थित समजते. म्हणून तर त्यांनी फक्त नोटिशीची भाषा वापरून संग्राम जगताप यांना अजून हात लावलेला नाही. किंबहुना ते लावू पण शकत नाहीत. याचा खरा अर्थ असा की अजितदादांच्या पक्षाने नुसतीच स्वबळाची खुमखुमी आणली आहे, प्रत्यक्षात एका आमदाराला आवरता येई ना, ही त्यांची गोची झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App