विशेष प्रतिनिधी
मुंबई : Harshwardhan Sapkal महात्मा गांधीजींची हत्या हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हल्ला होता आणि नथुराम गोडसे हाच पहिला दहशतवादी होता,’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही अप्रत्यक्ष आणि आक्षेपार्ह टीका करत, ‘गांधी हत्येच्या कटातील सहआरोपी ब्रिटिशांकडून पेन्शन घेणारा होता,’ असा गंभीर आरोप केला आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.Harshwardhan Sapkal
नाशिकमध्ये सध्या काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जिल्हानिहाय पक्षाची स्थिती आणि संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला असून, पक्ष बळकटीसाठी पुढील रणनितीवर चर्चाही करण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध विषयांवर भाष्य केले.Harshwardhan Sapkal
नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. “महात्मा गांधीजींचा खूनच झाला होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गांधीजींच्या खूनाच्या जागी ‘वध’ असा शब्द टाकण्याचे काम केले,” असा आरोप त्यांनी केला. मात्र, आता महाराष्ट्र ग्रंथातून हा शब्द हटवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावरकरांवर अप्रत्यक्षपणे आक्षेपार्ह टीका
हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधीहत्येच्या खटल्यातील आरोपींचा संदर्भ देत, सावरकरांवर अप्रत्यक्षपणे आक्षेपार्ह भाषेत टीका केली. ते म्हणाले, “नथुराम गोडसे हा गांधी हत्येच्या कटातील एक आरोपी होता. या कटातील सहआरोपींमध्ये ‘भगूरच्या आरोपीचा’ समावेश होता. हाच आरोपी ब्रिटिशांकडून 60 रुपये पेन्शन घेणारा होता. मात्र, पुराव्याअभावी त्याची मुक्तता करण्यात आली.”
या ‘भगूरच्या आरोपीने’ स्वातंत्र्यलढ्यात जेलमध्ये असताना माफीनामा दिला होता, तसेच त्यानेच द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, आणि त्यानेच गांधीहत्या घडवून आणली, असा दावा सपकाळ यांनी केला. कपूर आयोगाच्या अहवालात या सर्व गोष्टी नमूद असल्याचे ते म्हणाले.
केस टाकायची तर टाका
मी या गोष्टी पुराव्यानिशी बोलत असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच माझ्यावर कोणाला कोर्टात केस टाकायची असेल तर टाकावी, असे आव्हानही त्यांनी दिले. हर्षवर्धन सपकाळांच्या या वक्तव्यानंतर आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये फडणवीसांनी हरताळ फासला
हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारवर निशाणा साधला. कायदा-सुव्यवस्थेला देवेंद्र फडणवीस यांनी हरताळ फासला आहे. पूर्वी नाशिक सुसंस्कृत होते. नाशिकचे ड्रग्सचे गुजरात कनेक्शन आहे. त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. खुनाचे सत्र सुरू आहे. 9 महिन्यात 44 खून नाशिकमध्ये झाले आणि 45 वा खून लोकशाहीचा केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सांभाळलेली पिल्लावळ याला कारणीभूत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.
गिरीष महाजनांना टोला
नाशिकला पालकमंत्री नाहीत. कुंभमेळ्याचे मोठे ठेके मोठ्या कंत्राटदारांना देण्यात येत आहे. पिस्तुल्या म्हणून ओळख असणारे आणि स्वतःला संकटमोचक म्हणवणारे गिरीश महाजन केवळ येथे झेंडावंदन करतात, असा टोला सपकाळ यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App