विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.CM Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे, कारण गेली 10 वर्ष मोदींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगतो आहोत त्या प्रत्यक्ष आज लोकार्पित होत आहेत. ही खऱ्या अर्थाने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा जो आपला एअरपोर्ट आहे, खरे म्हणजे मी सांगू इच्छितो की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नव भारताचे प्रतीक आहे. या एअरपोर्टची संकल्पना 90 च्या दशकातील होती. आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो, तेव्हा एक बोर्ड लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचे एअरपोर्ट होणार. पण काहीच पुढे जायचे नाही. ज्या वेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आले, आम्ही मोदीजींना विनंती केली की जी काही विकासकामे आहेत त्यात नवी मुंबईचे एअरपोर्ट घेण्यात यावे.CM Fadnavis
10 वर्षात जे झाले नाही ते मोदींच्या एका बैठकीत झाले
आपल्याला आश्चर्य वाटेल मोदीजींनी प्रगतीच्या अंतर्गत हे एअरपोर्ट घेतल्यानंतर मागील 10 वर्षात 8 एनओसी अशा होत्या, पण त्या मिळत नव्हत्या. मोदींनी प्रगतीची पहिली बैठक ज्या दिवशी घेतली, त्या दिवशी सकाळपर्यंत मुख्य सचिवांनी सांगितले की साहेब 7 एनओसी आलेल्या आहेत आणि मग मोदींनी विचारले की 8 वी एनओसी का नाही? त्याला एक महिन्याची वैधानिक नोटीस होती. त्यानंतर 15 दिवसात आठवी एनओसी आली आणि जे 10 वर्षात झाले नव्हते ते मोदींच्या एका बैठकीत झाले आणि या एअरपोर्टची निर्मिती झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नवी मुंबईचा एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवू शकतो
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 9 कोटी प्रवाशी हॅंडल करू शकेल असा हा एअरपोर्ट, हा एअरपोर्ट एक इंजीनीरिंग मरव्हल देखील आहे. हे एअरपोर्ट तयार करण्यासाठी या ठिकाणी पहाड सुद्धा हटवण्यात आले. नदी जी आहे, त्या नदीला देखील परावर्तित करावे लागले आणि आज हा सुंदर एअरपोर्ट सुरू झालेला आहे. हा एअरपोर्ट भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मी तर असे म्हणाले केवळ हा एक एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्याने वाढवण्याची क्षमता ठेवतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे. हा एअरपोर्ट तयार होण्याआधीच मोदींच्या नेतृत्वात अटल सेतू तयार झाला आहे. आता तर हा पहिला एअरपोर्ट असेल ज्याला वॉटर टॅक्सी देखील मिळणार आहे.
देशातली सगळ्यात मोठी अन्डर ग्राउंड मेट्रो मुंबईमध्ये
दूसरा महत्त्वाचा जो आपला प्रकल्प आहे, आपली 40 किमीची अन्डर ग्राउंड मेट्रो, ही मेट्रो देखील मोदींच्या आशीर्वादाने सगळे अडथळे पार करत गेली. मला अभिमान आहे की देशातली सगळ्यात मोठी अन्डर ग्राउंड मेट्रो ही मुंबईमध्ये करू शकलो आणि साऊथ टु नॉर्थ कनेक्टिव्हिटी आपण करू शकलो. ही करत असताना शिंदे साहेबांनी सांगितले वेगवेगळे अडथळे तर आलेच, पण ग्रीन ट्रॅब्युनल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आम्ही काम पूर्ण करू शकलो. याचे कारण या प्रत्येक क्षणाला मोदीजी आमच्या पाठीशी होते अन केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभे होते. आज अजून एक तिसरे स्वप्न पूर्ण होत आहे. आज आपण मुंबई वन हे अॅप्लिकेशन लॉंच करण्यात आले आहे. सगळ्यासाठी आपल्याकडे आता एकच तिकीट असणार आहे. मुंबईला सुगम बनवणारा आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App