डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : शेतकरी कामगार पक्षासारख्या डाव्या कम्युनिस्ट चळवळीत संपूर्ण राजकीय आयुष्य घालविलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव राज्यातल्या भाजप महायुतीच्या सरकारने दिले आणि संघ स्वयंसेवक पंतप्रधान यांच्या हस्ते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. हा अनोखा राजकीय संगम आज नवी मुंबईत घडला.

– अदानींच्या कंपनीने केले काम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्माण गौतम अदानींच्या कंपनीने केले. ज्या अदानी आणि अंबानी यांच्या विरोधात राहुल गांधी आणि डाव्या चळवळीतले नेते कंठशोष करतात, त्याच अदानींनी बांधलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाला डाव्या चळवळीत आयुष्य घालवणाऱ्या दि. बा. पाटलांचे नाव दिले गेले. हा राजकीय उदारमतवाद संघ स्वयंसेवक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघ स्वयंसेवक असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविला.

दि. बा. पाटील उत्तर कोकणातल्या आगरी समाजाचे नेते होते. त्यांनी आगरी समाजामध्ये सुधारणा करण्याचे मोठे काम केले. नवी मुंबई सारखा मोठा प्रकल्प होत असताना त्यांनी आगरी समाजाला तिथून विस्थापित होऊ दिले नव्हते यासाठी त्यांनी त्यावेळच्या काँग्रेस शासनांशी संघर्ष केला. शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणुका लढवून ते पाच वेळा आमदार झाले. महाराष्ट्रातल्या डाव्या चळवळीचे ते फार मोठे आधारस्तंभ होते. परंतु राजकीय आयुष्याच्या अखेरीस त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून रायगड म्हणून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांचेच नाव एक भूमिपुत्र म्हणून नवी मुंबईच्या विमानतळाला देण्यात आले आहे.

– महाविकास आघाडीवर टीका

या कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही दि. बा. पाटील यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. पण त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या विकासाच्या कामात अडथळा आणायचा राजकारणावर सुद्धा निशाणा साधला. महाविकास आघाडीने मुंबई आणि परिसरातल्या सगळ्या विकास कामांना स्थगिती दिल्याने जनतेचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले. जनतेला असुविधा सहन कराव्या लागल्या, याविषयी नरेंद्र मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Navi Mumbai, Maharashtra PM Narendra Modi inaugurates Phase 1 airport

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात