भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

नाशिक : काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय. भाजपा बरोबरची सत्ता म्हणजे काँग्रेस बरोबरची सत्ता नव्हे की जिथे आपली परखड स्वभावाच्या नावाखाली दादागिरी चालू शकेल याची जाणीव आता अजित पवारांना झालेली दिसते.

ज्या पुणे जिल्ह्यातल्या दोन महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या बळावर अजितदादा दादागिरी करत होते, त्या तिन्ही ठिकाणी म्हणजे पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषद येथे स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी अजितदादांची दमछाक होताना दिसते आहे. कारण भाजपने बाकी कुठल्या पक्षांसमोर नव्हे, तर थेट अजितदादांच्या राष्ट्रवादी समोर तगडे किंबहुना जबरदस्त आव्हान उभे केले आहे. आणि ते आव्हान मोडीत काढणे हे अजितदादांच्या ताकदीचा घास राहिलेले नाही.

पुण्याचा प्रभाग रचनेत फटका

पुण्यामध्ये अजितदादांनी सुरेश कलमाडींवर मात करून दाखविली. परंतु, अजितदादांच्या तुलनेत फारच नवख्या असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना भाजपने अशी काही ताकद दिली की त्यामुळे अजितदादा मुरलीधर मोहोळ यांच्यापेक्षा फिके वाटायला लागले. कारण मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटलांनी पुणे महापालिकेची प्रभाग रचना करताना अशी काही मेख मारून ठेवली, की अजित पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिवाय तिथे जाऊन काही फायदाही झाला नाही. प्रभाग रचनेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जो फटका द्यायचा तो मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलाच कारण भाजपने त्यांना तसे बळ दिले.



पिंपरी चिंचवडच्या आमदारांना भाजपचे बळ

दुसरीकडे पिंपरी चिंचवड मध्ये आमदार महेश लांडगे यांनी 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे शिवधनुष्य हाती पेलले. अजित पवारांनी राष्ट्रवादी मिलन या नावाखाली पिंपरी चिंचवड मधले जुने राष्ट्रवादीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते एकत्र करायचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात फारच मर्यादित यश आले कारण पवार संस्कारित सत्तेची चटक लागलेले नेते आधीच भाजपच्या वळचणीला जाऊन बसले. त्यांना परत आपल्या छत्रछायेखाली आणणे अजित पवार यांना फारसे शक्य झाली नाही. पिंपरी चिंचवड मधल्या मातब्बर राजकीय घराण्यांच्या आधारे अजितदादांनी पिंपरी चिंचवड मध्ये बरीच दादागिरी करून झाली. स्वतःचे राजकारण धकवून झाले. पण भाजपने तिथे अशा काही गेमा फिट केल्या की अजितदादांना मर्यादे पलीकडचे यश मिळताच कामा नये, याची व्यवस्था भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये करून ठेवली. लांडगे लांडे, जगताप, गावडे, चिंचवडे अशा राजकीय घराण्यांना भाजपने स्वतःच्या वर्चस्व खाली आणले. त्याचाच लाभ महापालिकेत घेण्यासाठी कंबर कसली. सध्या पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचेच वर्चस्व असून त्यांचे चार आमदार आहेत. या सगळ्यांना भाजपने शेपट्या पिरगळून महापालिका निवडणुकीच्या कामाला लावले आहे.

सत्तेच्या वळचणीला राहूनही झगडण्याची वेळ

त्यामुळे पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिका या एकेकाळी अजितदादांची दादागिरी सहन कराव्या लागलेल्या महापालिकांमध्ये आता सन्मानजनक शिरकाव करण्यासाठी सुद्धा अजित पवारांना झगडावे लागणार आहे. त्यासाठी अजित दादा आहे “पवार संस्कारित राष्ट्रवादी प्रवृत्तीनुसार” महायुतीत राहून गेमा केल्याशिवाय राहणार नाहीत. ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी आतून संधान बांधून भाजपचे उमेदवार पाडायचा नक्की प्रयत्न करतील पण म्हणून त्यांना काँग्रेस सारखे भाजपला त्रास देता येईल ही शक्यता सुद्धा कमी आहे कारण सध्याचा बळकट सत्ताधारी भाजप म्हणजे काही काँग्रेस नाही की जिने पवारांची सगळी दादागिरी सहन करून स्वतःचा पक्ष पोखरू दिला. उलट भाजपचे नेते अजितदादांना असा काही राजकीय जमालगोटा देतील, की त्यांना राज्यातली सत्तेची वळचण टिकवताना स्थानिक पातळीवर छोट्या-मोठ्या सत्तेच्या पदांसाठी झगडावे लागेल.

भाजपच्या दीर्घकालीन राजकारणाचे सूत्र

कारण भाजपच्या दीर्घकालीन राजकारणाचे सूत्र महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणण्याचे आहे त्यासाठी राज्यातल्या महापालिकांवर एकछत्री अंमल आणणे हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यावर मार्गक्रमण करण्यासाठी भाजपला इतर पक्षांमध्ये अगदी मित्र पक्षांमधले सुद्धा स्थानिक नेतृत्व ठोकणे गरजेचे आहे म्हणूनच अजित दादांना महायुतीत राहून फारशी मोकळीक दिली जाणार नाही, जी मोकळीक अजितदादांना काँग्रेस बरोबरच्या सत्तेत होती तशी मोकळीक तर बिलकुल दिली जाणार नाही कारण तशी मोकळी देणे भाजपला परवडणार नाही याची पक्की जाणीव भाजपच्या नेत्यांना आहे. म्हणूनच भाजपने पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित दादांना limit मध्ये ठेवण्याची तयारी चालविली आहे.

Ajit Pawar facing difficulties in retaining the hold in Pune and Pimpri Chinchwad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात