भारतीय उद्योगपती ते जागतिक बँक सगळ्यांचीच राहुल गांधी + रघुराम राजन जोडगोळीला चपराक; सेवा क्षेत्र नव्हे तर उत्पादन क्षेत्र वाढविण्याची दिली हाक!!

नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांचे आर्थिक सल्लागार रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन या जोडगोळीला भारतीय उद्योगपती यांच्यापासून ते जागतिक बँकेपर्यंत सगळ्यांनीच जोरदार चपराक हाणली आहे. राहुल गांधी आणि रघुराम राजन यांनी सुचविलेल्या आर्थिक धोरणांना सगळ्यांनीच छेद दिला आहे. भारताने उत्पादन क्षेत्रात पडून चीनशी स्पर्धा करायला जाऊ नये. ते आपल्याला जमणार नाही. त्यामुळे भारतातला रोजगार वाढणार नाही. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत भारत मागे पडेल. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात पडण्याऐवजी भारताने सेवाक्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा. तिथे भारताला मोठी संधी आहे. सेवाक्षेत्रामुळेच भारतात मोठे रोजगार निर्माण होतील, असा दावा रघुराम राजन यांनी राहुल गांधींनी घेतलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर सुद्धा अनेकदा रघुराम राजन यांनी त्याच मताची पुनरावृत्ती केली होती. रघुराम राजन यांनी भारतातल्या उत्पादन क्षेत्राला दुय्यम स्थान देण्याची सूचना कायम ठेवली होती. मोदी सरकारच्या मेक इन इंडिया धोरणाला विरोध हे त्यांचे मुख्य सूत्र राहिले होते आणि आहे.

40 अंबानी आणि 40 अदानींची गरज

या पार्श्वभूमीवर भारतीय उद्योगपती आणि जागतिक बँक यांनी मात्र रघुराम राजन यांच्या युक्तीवादाला छेद देणारे युक्तिवाद समोर आणलेत. देशाला 40 अंबानी आणि 40 अदानींची गरज आहे भारत फार मोठा आहे इथे फक्त एक अदानी आणि एक अंबानी आहेत हे फार काळ चालणार नाही, अशा परखड शब्दांमध्ये उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी भारताच्या आर्थिक धोरणावर परखड भाष्य केले. त्या पलीकडे जाऊन भारताने आता सेवा क्षेत्रावर भर देण्यापेक्षा उत्पादन क्षेत्रामध्ये झेप घ्यावी. जागतिक दर्जाची उत्पादने बनवावीत. ती क्षमता भारतात आहे. भारतीयांमध्ये आहे. तिचा पूर्ण वापर करावा, असा सल्ला हिरानंदानी यांनी दिला. भारताला वैद्यकीय क्षेत्रात मोठी संधी आहे भारताने संपूर्ण जगाची वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा काळजी घेतली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. या वक्तव्यातून हिरानंदानी यांनी राहुल गांधी आणि रघुराम राजन या जोडगोळीच्या युक्तिवादाला छेद दिला.



जागतिक बँकेची ग्वाही

पण असा छेद देणारे निरंजन हिरानंदानी हे काही पहिलेच उद्योगपती नाहीत त्याच्या आधी काही दिवसच जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाई मुख्य अर्थतज्ज्ञ फ्रांझिस्का ओहन्सॉर्ज यांनी सुद्धा असेच परखड मत व्यक्त केले होते. भारताचे जागतिक व्यापार करार वाढले, तर उत्पादन क्षेत्रात भारताची मोठी झेप घेऊ शकेल अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

फ्रांझिस्का ओहन्सॉर्ज म्हणाल्या :

भारतात खाजगी गुंतवणुकीची वाढ महामारीपूर्वीच्या दरांपासून महामारीनंतरच्या दरांपर्यंत मंदावली आहे आणि इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये जे घडले आहे त्याच्या उलट आहे. सार्वजनिक गुंतवणूक वाढीच्या बाबतीत जे घडले आहे त्याच्या उलट आहे.

तथापि, या मंदीसह, भारतातील खाजगी गुंतवणुकीची वाढ इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, खाजगी गुंतवणूक वाढ कमकुवत नाही. फक्त भारताच्या आधीच्या मानकांनुसार, ती कमकुवत आहे.

निव्वळ एफडीआय ते जीडीपी प्रमाण उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आणि विकसनशील अर्थव्यवस्थांच्या खालच्या चतुर्थांशात आहे.

भारताला गुंतवणुकीसाठी दोन मोठ्या संधी आहेत. एक म्हणजे सेवा निर्यातीमध्ये आणि दुसरे म्हणजे वस्तू निर्यातीमध्ये कारण ते निर्यात उद्योग किंवा परदेशी गुंतवणूकदारांना रस असलेल्या व्यापारयोग्य उद्योगांमध्ये आहे.‌ संगणक सेवा निर्यातीत 30 % नी वाढ झाली आहे, परंतु एकूण सेवा निर्यातीत फक्त 10 % टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या क्षेत्रात खऱ्या संधी असल्याचे दिसते.

सध्या भारतात इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये आणि विकसनशील अर्थव्यवस्थांपेक्षा खूप कमी व्यापार करार आहेत. मध्यमवर्गीय वस्तूंवरील कर जास्त आहे. त्यामुळे भारतातले उत्पादन क्षेत्र मागे पडते. पण भारताच्या जर सध्या जागतिक पातळीवर व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू आहेत. या वाटाघाटी फलद्रप होऊन भारताचे जागतिक पातळीवर व्यापार करार वाढून ते प्रत्यक्ष अंमलात आले, तर भारताचे उत्पादन क्षेत्र प्रचंड वाढेल. भारतात उत्पादित झालेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या असलेल्या संधी पेक्षा प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध होतील. भारतीय वस्तूंचा जागतिक बाजारपेठेतील प्रवेश अनेक पटीने वाढेल. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी हे सर्वांत लाभदायी चित्र असेल.

Indian Industrialists and World Bank struck the same note for production oriented economic policy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात