नाशिक : पुणे महापालिकेतली प्रभाग रचना करताना भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातल्या दादागिरीला चांगलाच कोलदांडा घातला. अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतःला हवी तशी प्रभाग रचना करून घ्यायची होती. परंतु अजितदादांच्या या प्रयत्नांना भाजपच्या नेतृत्वाने छेद दिला. पुण्यात चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ हे अजित पवारांवर भारी ठरल्याच्या बातम्या सगळीकडून पुढे आल्या.
कारण अजित पवारांनी पुण्याच्या ग्रामीण भागात असलेल्या वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रभाग रचना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल व्हावी अशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला होता. परंतु भाजपच्या नेत्यांनी अजित पवारांचा तो डाव प्रारूप प्रभाग रचनेतच उधळून लावला. त्यावेळी अजित पवारांनी मुरलीधर मोहोळ यांची तुलना सुरेश कलमाडी यांच्याशी करून मोहोळ आणि भाजप या दोघांना डिवचले होते. या दोघांच्याही भांडणाच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यामुळे पुण्याच्या प्रभाग रचनेत पुण्यातल्या प्रभाग रचनेत अजित पवारच स्वतःची दादागिरी चालवतील, असे मानले जात होते. परंतु अंतिम प्रभाग रचनेत अजितदादांची दादागिरी चालली नाही वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने स्वतःला हवी तशीच प्रभाग रचना करून घेतली. त्यामुळे माझे महापौर दत्ता धनकवडे यांचा वार्ड पाच प्रभागांमध्ये विभागला गेला. ज्याचा लाभ राष्ट्रवादीला न होता भाजपला होण्याची दाट शक्यता आहे. अशी अनेक उदाहरणे पुण्यात घडली.
कलमाडींचे वर्चस्व मोडले, पण…
सुरेश कलमाडींच्या काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अजितदादांनी अखंड राष्ट्रवादीतून भरपूर प्रयत्न केले होते परंतु काँग्रेसच्या घसरणीनंतरच अजित पवारांना त्यात यश आले होते. परंतु ते यश सुरेश कलमाडी यांच्या यशाप्रमाणे फारसे टिकून राहिले नाही कारण महाराष्ट्रातच भाजपची दमदार एन्ट्री झाली आणि तिथेच अजित पवारांच्या वर्चस्वाला पुण्यातून सुरुंग लागला. 2017 मध्ये भाजपने अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या अखंड राष्ट्रवादीचा पराभव करून पुणे महापालिका ताब्यात घेतली. ती पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी अजित पवारांनी जंग जंग पछाडले तरी त्यांना प्रभाग रचनेतच पहिला कोलदांडा बसला.
काका – पुतणे एक होण्याची शक्यता, तरीही…
पण म्हणून अजितदादा स्वस्थ बसण्याची शक्यता नाही. उलट महायुतीच्या सत्तेची उब भोगत ते पुणे महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेऊन भाजपला त्रास देण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दोन्ही राष्ट्रवादीतून एकमेकांशी संधान बांधून भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. पण भाजप अजित पवारांची अशी डबल ढोलकी सहन करण्याची शक्यता नाही, हेच भाजपने प्रभाग रचनेत अजितदादांना कोलदांडा घालून दाखवून दिले आहे. अजित पवारांनी शरद पवारांशी जुळवून घेण्याची खेळी केली, तर भाजपही वेगळ्या मार्गाने त्यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अजित पवारांना सुरेश कलमाडींचे वर्चस्व मोडण्यात काहीसे यश मिळाले असले तरी भाजपचे वर्चस्व बोलण्यात अजित पवार यशस्वी होण्याची शक्यता दुरापास्त आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App