BJP MLA Padalkar : गोपीचंद पडळकरांचा बीडच्या कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप- जेलमध्ये धर्मांतराचे काम; महापुरुषांचे फोटो काढले, कीर्तनही बंद

Gopichand Padalkar

विशेष प्रतिनिधी

बीड : BJP MLA Padalkar  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता बीड कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच जेलमधील कीर्तन बंद करण्यात आले असून कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयाचे आमिष दाखवले जात असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली असून या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.BJP MLA Padalkar

भजन कीर्तन पूर्णपणे बंद

गोपीचंद पडळकर म्हणाले, बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत तिकडे ते धर्मांतराचे काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबलमधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेल आहे. तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत.BJP MLA Padalkar



तसेच बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास करावा अशी मागणी केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा

दरम्यान, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी चौकशी सुरू आहे ती चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू करावी. या मागणीसाठी देखील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पडळकर यांनी सांगितले आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागच्या वेळेस नोकर भरती घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि नव्याने नोकर भरती व्हावी अशी मागणी केलेली आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणी यात देखील आर्थिक घोटाळा झालेला आहे. त्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी तिसरी मागणी केलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी कारखानदारांनी उभे राहावे

सध्या मराठवाड्यात अतिवृष्टीने मोठे सुकसान झाले आहे. या विषयी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका योग्य घेतलेली आहे की कारखानदारांना 10,000 कोटींची मदत केलेली आहे. मग जर असा प्रसंग शेतकऱ्यांवरती येत असेल तर कारखानदारांनी का उभा राहू नये? तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करता आणि मग अशा बाबतीमध्ये तुम्ही परत माघार घेण्याची गरज नाही ना. तुम्ही पुढे यायला पाहिजे होते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

BJP MLA Padalkar Accuses Beed Jail Superintendent of Promoting Conversion: Photos of Deities Removed, Kirtan Banned

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात