विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ramdas Kadam शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घडलेल्या घटनांवरून पुन्हा एकदा वादंग पेटला आहे. सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एक धक्कादायक दावा करत म्हटले की, “बाळासाहेबांचे सरण या लोकांनी आधीच रचले होते. त्या तयारीत विनायक राऊत आघाडीवर होते, हे नाव मी आज स्पष्ट करतो.”Ramdas Kadam
काही दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. कदम म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवून छळ केला.” या वक्तव्यामुळे प्रचंड राजकीय गदारोळ झाला होता. याच संदर्भात संजय शिरसाट यांनी कदमांच्या आरोपाला समर्थन दिले आणि आणखी खुलासा केला.Ramdas Kadam
शिरसाट म्हणाले, “बाळासाहेRamdas Kadam बांचे निधन झाले तेव्हा मीसुद्धा दोन दिवस मातोश्रीवर होतो. माझ्या माहितीप्रमाणे, विनायक राऊत यांनी दोन दिवस आधीच सरणाच्या तयारीला सुरुवात केली होती. त्यावेळचे मुंबईचे पोलीस आयुक्तांनीही मातोश्रीवर येऊन प्रश्न विचारले होते, ‘काय चालले आहे, आम्हाला माहिती द्या.’”Ramdas Kadam
यानंतर दिवाकर रावते आणि काही इतर शिवसेना नेत्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन काही तयारी केली होती. मात्र नंतर ती तयारी अचानक थांबवण्यात आली आणि परिस्थिती वेगळी वळण घेतली, असे शिरसाट यांनी सांगितले.
शिरसाट पुढे म्हणाले, “सत्य काय आहे, हे त्या काळात उपस्थित असलेल्या सगळ्यांना माहीत आहे. पण या विषयावर आम्ही कधीच उहापोह केला नाही. कारण बाळासाहेबांच्या आत्म्याला दुखवण्याची आमची इच्छा नव्हती. मात्र आता कदमांवर खोटा आरोप केल्याचे म्हणणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी मला हे सत्य जाहीर करावे लागत आहे.”
शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेली कुरघोडी, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आणखी तीव्र झाली आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यातील वाद आता फक्त सध्याच्या राजकारणापुरता मर्यादित नसून, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या काळातील घडामोडींवरही पोहोचला आहे. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App