विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काल दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांच्यावर शरसंधान साधलेच, पण आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या सकट अजित पवारांना सुद्धा घेरले. धनंजय मुंडे आणि अजित पवारांचे राजकारण संपविण्याची धमकी दिली.
धनंजय मुंडे यांनी, मराठा समजाला आरक्षण दिलं, याचा आनंद आहे. पण ओबीसीमधून देऊ नका. त्यांना ओबीसीतून आरक्षण का हवं? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रतिप्रश्न केला. “तुम्ही का घेतलं बंजारा समाजातून? नाही घ्यायचं, कशाला घेतलं?. कशाला लोकांच्या काड्या करतो. मला काय बोलतो हेकन्या, आम्ही ओबीसीच खातो, मग तू बंजारा समाजाच का खातो? तू दिसतो का त्यांच्यासारखा?” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.
मनोज जरांगे म्हणाले :
तू माझ्या नादी लागू नको. त्याला एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नका. शहाणपणा करायचा नाही. दादा फादा मी मोजती नसतो. रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्यावर, माझ्या जातीवर बोलायचं नाही. माझ्या नादालालागला तर दोघांचा बाजार उठवेन. छक्के-पंजे माझ्यासोबत खेळू नको. तुझ्यामुळे अजित पवारचा पण कार्यक्रम लावीन. मी जातीला कट्टर मानणारा आहे. ऐकून घेतोय म्हणून शहाणपणा करायचा नाही. तो ज्याच्या प्रचाराला जाणार, त्या सीट पाडणार.
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या ना, आमच्या ताटातलं घेऊ नका, पण तुम्ही लोकांच्या ताटातलं ओरबाडून खाता ना. तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवता का?, तुम्ही बिचाऱ्या त्या बंजारा समाजाच्या 5 % जागा खाल्ल्या. बंजारा लोकांच वाटोळं केलं, काय ज्ञान शिकवता?” लक्ष्मण हाकेला मी मोजीत नाही.
धनजय मुंडेंनी कट ऑफ लिस्ट सांगितली. तू किती हुशार आहे माहित आहे, तुला पुन्हा एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको. शहाणा असशील तर हातातून वेळ गेलेली नाही. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. छगन भुजबळचं ऐकून माझ्या जातीच्या नादी लागू नको. तुझ्या राजकीय करिअरचा देव्हारा करून टाकेन. राजकारणातून तुमचं नामोनिशाण जाईल. लय बेकार होईल, मराठा संपवून टाकतील, त्यांनाही पाडतील. मराठे हुशार झालेत. आता मराठ्यांनी कडवट रहायचं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App