उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही, उध्दव ठाकरे यांच्यावर रामदास कदमांचा हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले, असा आरोप शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला.

मुंबईतील नेस्को सेंटर येथे आयोजित केलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात कदम बोलत होते. कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? आतमध्ये तुमचं काय चाललं होतं? आम्ही मातोश्रीच्या खाली बसलो होतो. मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी होतं? कोणीतरी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते? त्यावेळी मातोश्रीवर या सगळ्याची चर्चा सुरु होती. बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, काढा सगळी माहिती.



उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रि‍पदाचा हव्यास होता. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली. पण सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’, अशी घोषणा व्हायची. आज हे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात आहेत. आता एक काय १० भाऊ आले तरी काय. आज मराठी माणूस मुंबईबाहेर केला, हे पाप उद्धव ठाकरे यांचे आहे. उद्धव ठाकरे यांनी ३० वर्षे फक्त टक्क्यांचं राजकारणं केले. मुंबईचा महापौर आपला असला तरी तिथे जायचा अधिकार आम्हाला नव्हता, असा हल्लाबोल कदम यांनी केला.

Ramdas Kadam attacks Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात