नाशिक : दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!, असेच आजच्या दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यांचे वैशिष्ट्य ठरले. सकाळी झालेला संघाचा मेळावा हा शताब्दी मेळावा ठरला. त्यामध्ये संघ + सेवाभाव + समर्पण या विषयावर अधिक चर्चा झाली. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्या प्रचलित झालेल्या आर्थिक नीतीचा फेरविचार करायचे आवाहन सरकारसह सर्व समाजाला केले कारण सध्याच्या प्रचलित अर्थनितीत शोषकांना शोषणाचा सुरक्षित अधिकार देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले.Dussehra gatherings are being violated; speeches are being recited for political gain
– मंत्रीपद गेल्याचे धनंजय मुंडेंना खंत
मनोज जरांगे यांनी नारायण गडावर दसरा मेळावा घेतला, तर पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर मेळावा घेतला. दोन्ही मेळाव्यांमधली भाषणे प्रामुख्याने राजकीय लाभासाठीच झाली. पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने त्यांनी सर्व समाजाला काही ना काही तरी देण्याची भाषा केली. जातीपातीचा राक्षस संपविण्याची भाषा वापरली, पण त्याच मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी मात्र स्वतःचे मंत्रिपद गेल्याबद्दल खंत व्यक्त केली. माझ्यावर वेगवेगळ्या आरोप झाले. काही लोक कोर्टात गेले. कोर्टाने मला क्लीन चीट दिली तरीसुद्धा मी मीडिया ट्रायल मुळे 256 दिवस शिक्षा भोगतोय, असे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी महायुतीतल्या नेत्यांची स्तुती करून घेतली कारण त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवायचे आहे. माझ्या संकट काळात महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला, असे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांचे भावनिक भाषण
मनोज जरांगे यांनी भावनिक भाषण केले. त्यामुळे त्यांचे समर्थक हेलावले. त्यांनी सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आवाहन केले शेतकऱ्यांना 70000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यायला सांगितले तसे घडले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा दिला.
मराठा समाजाला शासक बनायचे आवाहन
त्या पलीकडे जाऊन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला शासक आणि प्रशासक बनायला सांगितले मराठा समाजातले गरीब शासक आणि प्रशासक बनले, तर नेत्यांपुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही. नेतेच तुमच्याकडे निवडून येण्यासाठी दारात येतील. त्यामुळे तुम्ही शासक आणि प्रशासक बनायचा दिशेने प्रवास करा, असे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सांगितले. ज्या मराठा समाजाचे दीडशे पेक्षा जास्त आमदार विधानसभेत आहेत, त्या मराठा समाजाला शासक बनायला मनोज जरांगे यांनी प्रवृत्त केले. हैदराबाद सह कोल्हापूर पुणे सातारा सगळी गॅजेट लागू करण्याचा शब्द आपण सरकारकडून घेतल्याचे उत्तर मनोज विचारांनी यांनी शाहू महाराजांना दिले.
पण पंकजा मुंडे यांचा मेळावा आणि मनोज जरांगे यांचा मेळावा हे दोन्ही मेळावे राजकीय लाभ मिळविण्यासाठी भाषणे करणारेच ठरले. त्या पलीकडे कोणत्याही धोरणात्मक बाबींवर फारशी चर्चा झाली नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App