विशेष प्रतिनिधी
सातारा : Udayanraje Bhosale पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंदाचा ऐतिहासिक शाहू नगरीतील अर्थात सातारा शहरातील शाही दसरा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. तसेच समाजहित लक्षात घेऊन दसरा उत्सवासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.Udayanraje Bhosale
विदर्भ, मराठवाडा, कोकणासह सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने हाहा:कार माजवला आहे. हजारो लोक बाधित झाले आहेत. पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर साताऱ्यातील विजयादशमी शाही सिमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाही दसरा उत्सवाचा खर्च पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याचेही खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.Udayanraje Bhosale
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात जीवित आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा पुरता उध्वस्त झाला आहे. त्यामुळे शाही दसरा उत्सवासाठीचा खर्च पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी वर्ग करावा, अशी सूचनाही उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
बळीराजा संकटात असताना शाही विजयादशमी आणि सिमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धुमधडाक्यात, डामडौलात करणे हे आमच्या मनाला पटणारे नाही, अशी भावना उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. प्रत्येकाने शक्य होईल तितकी आर्थिक, वस्तु किंवा धान्य स्वरुपातील मदत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App