Gavai family : आरएसएसच्या विजयादशमी निमंत्रणावरून गवई कुटुंबात वाद

Gavai family

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Gavai family  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी सोहळ्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना आमंत्रण देण्यात आले होते. यावरून आता गवई कुटुंबात मोठा वाद उभा राहिला आहे.Gavai family

कमलताई गवई यांनी या आमंत्रणावर आणि त्यासंबंधित प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले की, “विजयादशमी हा हिंदू समाजासाठी महत्त्वाचा उत्सव आहे; मात्र आमच्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन, म्हणजेच अशोक विजयादशमी, सर्वोच्च महत्त्वाचा आहे. माझ्या संमतीशिवाय माध्यमांतून अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणे ही RSS कडून रचलेली कटकारस्थान आहे. मी या आमंत्रणाचा स्वीकार केलेला नाही आणि माझे नाव वापरून केलेल्या प्रचाराचा मी निषेध करते.”Gavai family



तसेच, कमलताई गवई यांनी आंबेडकरवादी बांधवांना आवाहन केले की, “अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. संविधान आणि आंबेडकरी विचारसरणीप्रती माझी निष्ठा कायम आहे.”

मात्र, त्यांच्या या भूमिकेच्या काही तासांनंतरच त्यांचे सुपुत्र आणि रिपब्लिकन पार्टीचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून वेगळीच भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “कमलताई गवई विजयादशमी सोहळ्यास नक्कीच उपस्थित राहतील. मी स्वतःने देखील RSS चे आमंत्रण स्वीकारले आहे.”

या विरोधाभासी भूमिकेमुळे गवई कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिवंगत आर. एस. गवई, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते आणि माजी राज्यपाल, यांनी 1981 साली नागपूर येथील संघ शिक्षण वर्गाच्या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. तसेच, काँग्रेसशी त्यांची दीर्घ नाळ होती. राज्यपाल म्हणून केरळमध्ये त्यांनी पिनराई विजयन यांच्या SNC-लावलीन प्रकरणातील चौकशीस परवानगी देऊन धाडसी निर्णय घेतला होता.

आज सरन्यायाधीश भूषण गवई स्वतः मान्य करतात की, त्यांच्या वडिलांचा काँग्रेस पक्षाशी 40 वर्षांचा संबंध होता. त्यांचे भाऊ डॉ. राजेंद्र गवई हे आजही काँग्रेस व रिपब्लिकन चळवळीशी निगडित आहेत. अशा पार्श्वभूमीवर RSS च्या विजयादशमी सोहळ्यात गवई कुटुंबाचा सहभाग, तसेच त्यासंबंधीची परस्परविरोधी विधाने, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वादंग निर्माण झाला आहे.

Dispute in Gavai family over RSS’s Vijayadashami invitation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात