विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis राज्याचे सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील धार्मिक मुद्यावरून निर्माण झालेल्या तणावाववर भाष्य करताना म्हटले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर प्रकरणात कडक कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.CM Fadnavis
अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी मुस्लिम समाजाने पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून धरला. त्यामुळे पोलिसांवर बळाचा वापर करण्याची वेळ आली. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी पोलिस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.CM Fadnavis
आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणार
फडणवीस म्हणाले, मी एका कार्यक्रमात व प्रवासात असल्यामुळे या घटनेची संपूर्ण माहिती अजून माझ्याकडे आली नाही. सध्या माझ्याकडे केवळ प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी यावर भाष्य करेन. पण अलीकडच्या काळात काहीतरी प्रयत्न होत आहे की, महाराष्ट्रात काही बोर्ड लावायचे किंवा काहीतरी करायचे. येथील सामाजिक आरोग्य बिघडवण्यामागे नेमके कोण आहे? हे आपल्याला शोधावे लागेल. ते नक्की आम्ही शोधू व त्यावर कारवाईही करू.
मुंबई, वसई भागातही अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आलेत. सोशल मीडियातही अशा नावांचा वापर केला जात आहे, अशी बाब यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यावर ते म्हणाले, मला तेच म्हणायचे आहे की, हे जाणीवपूर्वक होत आहे का? ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीपूर्वी काही प्रयत्न करण्यात आले. एक प्रकारे लोकांना संगठित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसाच प्रयत्न होत आहे का? याकडेही लक्ष द्यावे लागेल, असे ते म्हणाले.
पोलिसांना करावा लागला बळाचा वापर
उल्लेखनीय बाब म्हणजे, अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे एका समाजाच्या धर्मगुरूविषयी रस्त्यावर रांगोळी काढून आक्षेपार्ह कृती केल्याप्रकरणी दोन गटात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे सोमवारी तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यासाठी आंदोलकांनी पुणे – छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कोटला भागात रास्ता रोको केला. त्यामुळे पोलिसांवर जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करण्याची वेळ आली.
नेमके काय घडले हे पोलिस अधीक्षकांनी सांगितले
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या प्रकरणी एका समाजकंटकाला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. ते म्हणाले, आज सकाळी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोडवर रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर मुस्लिम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच ज्यांनी रांगोळी काढली त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतरही काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी कोटला येथे रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला. पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्याची सूचना केली. त्यांना विनंती केली. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला. यावेळी काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App