विशेष प्रतिनिधी
मुंबई : Praful Patel राज्यातील पूरस्थितीवरून राजकारण तापले असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मदतीवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री असताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीत किती मदत केली?’ असा सवाल केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यांच्या शैलीत प्रफुल्ल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले आहे.Praful Patel
नेमके काय म्हणाले होते प्रफुल्ल पटेल?
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी किती मदत केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला. उद्धव ठाकरे आज विरोधात आहेत. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हाही अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. त्यावेळी त्यांनी मदतीचे किती हात समोर केले, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे, असे ते म्हणाले. तसेच आमचे सरकार शंभर टक्के दिलासा दिल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.Praful Patel
संजय राऊत काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत केली, हे प्रफुल्ल्ल पटेल यांना चांगले माहित असायला हवे. तेव्हा त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी होता. त्यावेळी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. हे पटेल यांना माहिती नसले तर त्यांनी विड्या वळत बसावे. त्यांचा तो खानदानी मोठा व्यवसाय आहे.
आपण त्यांचा अपमान करत नाही, पण हे त्यांना माहिती असायला हवे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीची आजही शेतकरी आठवण काढत आहेत, आम्हाला तशीच कर्जमाफी द्या, अशी त्यांची मागणी आहे. हे पटेल यांना माहिती नसेल तर ते कोणत्या जगात वावरत आहेत, गेल्या पाच वर्षातील राज्यातील राजकारणाची त्यांना माहिती आहे काय? असा सवालही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App