अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील 10000 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, अतिवृष्टीग्रस्तांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा ओघ

Jalna district

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे मोठे हाल झाले. अतिवृष्टीमुळे सगळी धरणे भरली. त्यांच्यातून अतिरिक्त विसर्ग करावा लागला.

जायकवाडी विसर्गामुळे जालना जिल्ह्यात सुमारे 10,000 लोकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, यातील 6870 नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी येथील हे नागरिक आहेत. त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. 23 ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी हलवून त्यांना चारा देण्यात येत आहे.



– मदतीचा ओघ कायम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे सचिन मेहेर यांनी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹2,01,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ‘एंडेव्हर ग्रीन सोल्यूशन्स’ यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.

10000 people in Jalna district shifted to safer places

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात